आज काल प्रत्येक माहिती असेल किंवा पत्रव्यवहार असेल तर तो मेल द्वारे केला जातोय.आणि अशात जर चुकून एखादा मेल जर डिलीट झाला तर काय करावे? तर असा डिलीट झालेला मेल रिकव्हर करत येतो.तेही सोप्या पद्धतीने.
- डिलीट झालेले ईमेल रिकव्हर करण्यासाठी कॉम्प्युटर/लॅपटॉपवर Gmail ओपन करा.
- त्यानंतर लेफ्ट कॉर्नरवर क्लिक करून खाली स्क्रॉल करा.
- येथे तुम्हाला Trash पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- येथे तुम्हाला डिलीट केले सर्व ईमेल्स दिसतील.
- त्यानंतर मूव्ह टू चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून इनबॉक्सवर टॅप करा.
- आता डिलीट झालेले ईमेल रिकव्हर होतील.
iPhone आणि iPad यूजर्स असे रिकव्हर करू शकतात डिलीट झालेले Emails
- सर्वात प्रथम Gmail ओपन करा.
- आता डाव्या बाजूला असलेल्या मेन्यूवर टॅप करा.
- त्यानंतर Trash पर्यायावर क्लिक करा.
- येथे डिलीट झालेले सर्व ईमेल्स दिसतील.
- आता डिलीट झालेल्या ईमेलवर क्लिक करून मेन्यूवर टॅप करा.
- आता स्क्रीनवर एक पॉप अप येईल. त्यातील मूव्ह ऑप्शनवर टॅप करा.
- पुढे इनबॉक्सवर क्लिक करा.
- हे केल्यानंतर सर्व डिलीट झालेले मेल रिकव्हर होतील.
Android यूजर्स असे रिकव्हर करू शकतात डिलीट Emails
- सर्वात प्रथम जीमेल ओपन करा.
- आता डाव्या बाजूला असलेल्या मेन्यूवर टॅप करा.
- त्यानंतर ट्रॅश पर्यायावर क्लिक करा.
- आता जे ईमेल रिकव्हर करायचे आहेत, त्यावर क्लिक करा.
- पुढे उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट मेन्यूव्र क्लिक करा. त्यानंत मूव्ह सेक्शनमध्ये जाऊन इनबॉक्सवर टॅप करा.
- हे केल्यानंतर डिलीट झालेले ईमेल रिकव्हर होतील.