शासन परिपत्रक युवा व क्रिडा मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या निदेशानुसार दिवंगत पंतप्रधान मा. राजीव गांधी यांचा जयंती दिवस २० ऑगस्ट हा दिवस दरवर्षी “सद्भावना दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या कार्यालयीन ज्ञापन क्र. एफ-२८- २२/२००६ वा. एस-४, दि. १८ जुलै २००६ अन्वये देण्यात आलेल्या निदेशास अनुसरुन, उपरोक्त सद्भावना दिवसाच्या अनुषंगाने दि. २० ऑगस्ट २०२२ ते दि ५ सप्टेंबर, २०२२ हा पंधरवडा #सामाजिक ऐक्य पंधरवडा” म्हणून साजरा करण्याचे शासनाने ठरविले आहे. राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्माच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकांविषयी ऐक्याची भावना, सौहार्द भाव वृध्दीगंत करणे व हिंसाचार टाळणे ही प्रमुख उद्दीष्ट्ये पंधरवडा साजरा करण्यामागे आहेत. २. दि. २० ऑगस्ट २०२२ हा “सद्भावना दिवस” म्हणून साजरा करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत.
अ) मंत्रालयाच्या प्रांगणात दि. २० ऑगस्ट २०२२ रोजी “सद्भावना दिवस” साजरा करण्यात यावा व सर्व उपस्थितांना सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्यास सांगण्यात यावे, तसेच या दिवशी सद्भाबना शर्यत आयोजित करण्यात यावी. याबाबत प्रतिज्ञेची प्रत सोबत जोडली आहे.
(ब) बृहन्मुंबईत लोकांच्या विशेषतः युवकांच्या सहभागाने संचालक, सांस्कृतिक कार्य महाराष्ट्र राज्य यांनी सद्भावना या विषयावर समुहगान आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत.
शासन परिपत्रक क्रमांका अविवि-२०२२/प्र.क्र.५०/का.८
क) महसूल विभागाच्या आयुक्तांनी सद्भावना शर्यत आयोजित करावी. त्यांच्या कार्यालयात सद्भावना दिवसाची प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रम आयोजित करावा. (शर्यतीची कार्यपध्दती आणि प्रतिज्ञेचा नमुना सोबत जोडला आहे.)
(ङ) राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालये व सर्व शासकीय कार्यालये यामध्ये कार्यालय प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली सर्वधर्म प्रार्थना सभा घेण्यात यावी व सर्व उपस्थितांना सद्भावना शपथ घेण्यास सांगण्यात यावे. तसेच सद्भावना शर्यत आयोजित करावी (नमुना सोबत जोडला आहे). तसेच युवकांच्या सहभागाने सद्भावना या विषयावर समुहगान आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत.
इ) विद्यापीठे, महाविद्यालये आणि शाळांमध्ये सुध्दा अशाच तऱ्हेचे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. या विषयीचे आवश्यक ते आदेश शालेय शिक्षण तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभागाने संबंधितांना द्यावेत. नेहरू युवा केंद्र, भारत स्काऊट आणि गाईडस व राष्ट्रीय सेवा योजना यांना देखील कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेण्यात यावे.
३.याशिवाय दिनांक २० ऑगस्ट, २०२२ ते ५ सप्टेंबर २०२२ हा पंधरवडा “सामाजिक ऐक्य पंधरवडा ” म्हणून राज्यात साजरा करण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. अ) सामाजिक ऐक्याचा संदेश प्रसृत करण्यासाठी मानवी साखळी (Human Chain) सारखे कार्यक्रम राज्यातील जिल्हा मुख्यालयात संबंधित जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करावेत.
आ) जिल्हाधिकाऱ्यांनी युवक परिषदा आयोजित करून त्यामध्ये जिल्हातील प्रख्यात स्वातंत्र्य
सैनिकांना भाषण देण्यासाठी निमंत्रित करावे. इ) सदर पंधरवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी इतर सांस्कृतिक कार्यक्रम सुध्दा आयोजित करावेत.
ई) संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी सदर पंधरवडयामध्ये बृहन्मुंबईत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत.
४. उपरोक्त सद्भावना दिवस” व “सामाजिक ऐक्य पंधरवडा” या कार्यक्रमांच्या प्रसिध्दीसाठी
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने दूरदर्शन व आकाशवाणीच्या स्थानिक अधिकान्यांशी संपर्क साधून कार्यक्रमांना पुरेशी प्रसिध्दी द्यावी.
५. उपरोक्त कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची खबरदारी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी व कार्यक्रम पार पाडल्यानंतर शासनास त्याचा अहवाल सादर करावा.
शासन निर्णय