मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद (सर्व),
विषय केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरण्याबाबत.
संदर्भ- १. श्री. दत्तात्रय शिंदे, कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई – ३२ यांचे पत्र क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र. ६४/टिएनटि-१, दिनांक ०३ ऑगस्ट, २०२२ या कार्यासनांस दिनांक १९ ऑगस्ट, २०२२ रोजी प्राप्त.
२. मा. सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग), यांची दिनांक २६/०७/२०२२ रोजी झालेली बैठक. व मा. मंत्री महोदय (शालेय शिक्षण व क्रिडा विभाग), यांची दिनांक ०५/०९/२०२२ रोजी झालेली बैठक
उपरोक्त संदर्भिय पत्र क्र. १ च्या पत्राचे अवलोकन व्हावे,
केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरणेबाबत दिनांक ०२/०२/२०१० रोजीच्या शासन निर्णयानुसा सदर पदे सरळसेवा, विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारा व पदोन्नतीद्वारे ४० ३० ३० या प्रमाणात भरती करावयाचे आदेश आहेत. तथापि तूर्त शासन निर्णय दिनांक ०२/०२/२०१० नुसार शासन निर्णयात नमूद केल्यानुसार पदोन्नतीची ३० टक्के पदे भरण्याची तात्काळ कार्यवाही करणेबाबत व केंद्रप्रमुखांच्या निवड प्रक्रिये अंतर्गत भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र, इतिहास व भुगोल विषयांसाठी समप्रमाणात पदे भरण्याबाबत तसेच सदर विषयानुरूप केंद्रप्रमुखांची जी पदे भरणे शक्य आहे ती पदे तात्काळ भरणेबाबत उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये संचालनालयास आदेशित केलेले आहे..
त्याअनुषंगाने कळविण्यात येते की, विषयांकित बाब ही आपल्या अखत्यारित असल्याने याबाबत आपले स्तरावरुन
दिनांक २६/०७/२०२२ चे बैठकीचे इतिवृत्तामधील मुद्दा क्र. २ मधील उप मुद्दा क्र. २.२ व २.४ नुसार व
दिनांक ०२/०२/२०१० रोजीच्या शासन निर्णयानुसार केंद्रप्रमुखांची ३० टक्के च्या मर्यादित पदोन्नतीने व विषयाच्या समप्रमाणात जी पदे भरणे शक्य आहे ती रिक्त पदे भरणेबाबतची कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल योग्य त्या अभिप्रायासह संचालनालयास सादर करावा. सोबत दिनांक २६/०७/२०२२ चे बैठकीचे इतिवृत्ताची छायांकित प्रत माहितीसाठी तथा सुलभ संदर्भासाठी सदर पत्रासोबत संलग्न केली आहे.
पत्र वाचा