केंद्रप्रमुखांची रिक्त पदे सरळसेवेने व मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे भरण्याकरीता स्पर्धा परीक्षेचेआयोजन करणेबाबत.

प्रति, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद (सर्व),

विषय :- केंद्रप्रमुखांची रिक्त पदे सरळसेवेने व मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे भरण्याकरीता स्पर्धा परीक्षेचेआयोजन करणेबाबत.

संदर्भ- १. ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांची अधिसूचना क्र. सेवाप्र- २०१३/प्र.क्र. १०६/आस्था-९

दिनांक १० जून २०१४

२. मा. मंत्री महोदय (शालेय शिक्षण व क्रिडा विभाग), यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०५/०९/२०२२ व

दिनांक ०७/०९/२०२२ रोजी पुणे येथे पार पडलेल्या बैठकीत मा. मंत्री महोदय यांनी दिलेले निदेश.

३. मा. आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- ०१ यांचे पत्र जा. क्र. मरापप/वापवि/२०२२/४४४/

दिनांक १५/०९/२०२२ उपरोक्त संदर्भिय १. २ व पत्र क्र. २ ये अवलोकन व्हावे. मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०७/०९/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे येथे पार पडलेल्या बैठकीत मा. मंत्री महोदयांनी केंद्र प्रमुखांची दिक्त पदेविभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा व पदोन्नती द्वारे ५० : ५० भरण्याचे प्रमाण निश्चित करण्याचे निर्देश दिलेलेआहेत. त्याअनुषंगाने कळविण्यात येते की, यासंदर्भात केंद्रप्रमुखांचे निर्गमित सर्व शासन निर्णय व दिनांक१० जुन.२०१४ ची अधिसूचना विचारात घेऊन केंद्रप्रमुखांचा विदुनामावलीनुसार रिक्त पदांचा तपशिल संचालनालयास त्वरित उपलब्ध करुन द्यावा, जेणेकरून केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांचा तपशिल उपलब्ध करुन दिल्यानंतर सर्व माहिती एकत्रित करून मा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे याना सादर करणे सुलभ होईल.

सहपत्र : वरीलप्रमाणे

(महेश पालकर)

शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे १

प्रत माहितीस्तव :

१. मा. सचिव, शालेय शिक्षण क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२

२. मा. आयुक्त (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे- ४०० ००१ ३. मा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद, पुणे- ०१

४. नियड नस्तो, प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *