आपण वर्षनुवर्षे आपले जुने फोटो आपल्या मोबाईल मध्ये जपून ठेवत असतो म्हणजे जेव्हा गरज असेल व आठवण येईल किंवा रिकाम्या वेळात आपणास जुन्या आठवणींना उजाळा देणे शक्य होत असत.
परंतु या फोटो आपल्याकडून चुकून किंवा काही कारणास्तव डिलीट होण्याचा धोका असतो. आणि एकदा डिलीट झाल्यानंतर हे फोटो परत मिळणं शक्य नसतं. त्यामुळं याला पर्याय म्हणून अनेकजण हे फोटोज सोशल मीडियावरही जसे की फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर इ.ठिकाणी शेयर करून स्टोर करत असतात. हाही पर्याय आपण वापरू शकतो परंतु हा पर्याय काही तितकासा योग्य वाटत नाही कारण आपण आपला प्रत्तेक फोटो या सोशल मीडिया साईटवर अपलोड करू शकत नाही व ते संयुक्तिकही ठरणार नाही.पंरतु आता स्मार्टफोनमधून चुकुन डिलीट झालेले फोटो आता पुन्हा मिळवणं शक्य झाले आहे.
त्यासाठी Android युजर्ससाठी Google Photos ला स्मार्टफोनशी सेट करावं लागणार आहे. त्याद्वारे आपले फोटो आपणास सुरक्षित ठेवता येणार आहेत. आयफोनमध्ये फोटो सेव्ह करण्यासाठी Apple iCloud चा वापर करायला हवा. त्यासाठी युजर्सला लॉगिन करण्यासाठी त्याच्या Apple ID चा वापर करावा लागेल.
त्यासाठी सेटिंगमध्ये जाऊन ICloud Photos चा पर्याय निवडून त्याला ऑन करावं लागेल. त्यानंतर स्मार्टफोनमधील डिलीट झालेले व्हिडिओ आणि फोटोदेखील रिकव्हर करता येतील. परंतु त्यासाठी आयफोनच्या युजर्सना पैसे भरावे लागतील. आयफोनमध्ये iCloud युजर्सला 5GB फ्री स्पेस देण्यात येतो.
Android मोबाईल वापरणारासाठी गुगल Play Store वरून Google Photos हे App इन्स्टॉल करून घ्या त्यानंतर आपल्या इमेल आयडी ने लॉगिन करा. त्यानंतर प्रोफाईलवर जाऊन बॅकअप आणि सिंकच्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर त्यात फोटोज आणि व्हिडिओ स्टोर व्हायला सुरूवात होईल.
चुकुन डिलीट झालेले आयफोन मध्ये रिकव्हर करण्यासाठी iCloud ओपन करा त्यामध्ये Album वर क्लिक करा. त्यानंतर Recently Deleted च्या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर जे फोटो किंवा व्हिडिओ रिकव्हर करायचं आहे. त्याला क्लिक करा यानंतर डाटा रिकव्हर होईल.
त्याचबरोबर Android स्मार्टफोन्स साठी Google Photos मधील Library ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर Trash च्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या स्मार्टफोनमध्ये डिलीट झालेल्या फोटो अथवा व्हिडिओला सेलेक्ट करा. त्यानंतर डाटा रिकव्हर होईल. Google Photos मध्ये युजर्सला 1.5GB पर्यंतचा फ्री स्पेस देण्यात येत आहे.
डिलीट झालेले फोटो,व्हिडीओ रिकव्हर करण्यासाठी प्ले store इतरही अनेक app उपलब्ध आहेत आपण त्यांचा वापरही करू शकता.ते app पुढील प्रमाणे आहेत.
- Backup and restore cloud storage —या app च्या लिंकसाठी येथे क्लिक करा
Deleted photo recovery app restore deleted photos
या app च्या लिंकसाठी येथे क्लिक करा
अशा प्रकारचे अनेक app आहेत आपण यांचाही वापर करू शकता