Teacher Transfer 2023 | (संवर्ग 4 )बदली पात्र शिक्षक महत्वाचे मुद्दे, जिल्हांतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया |

बदली पात्र शिक्षक-संवर्ग 4
जिल्हांतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया

बदली पात्र शिक्षक (संवर्ग 4 ) महत्वाचे मुद्दे-
दिनांक 20 जानेवारी 2023 ला बदली पोर्टलवर बदली अधिकार पात्र शिक्षकांच्या बदल्याची यादी व पोर्टलवर आपली बदली कुठे झालेली आहे हे समजेल.20 जानेवारी 2023 रोजीच मुख्य कार्यकारी अधिकारी रिक्त पदांच्या याद्या पुन्हा प्रकाशित करतील. बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी दिनांक 21 जानेवारी 2023 ते 24 जानेवारी 2023 दरम्यान आपला 30 शाळांचा प्राधान्यक्रम भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध होईल.
https://ott.mahardd.in/

सदर वेळापत्रकानुसार बदली प्रक्रिया पार पडली असता दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी सर्व संवर्गातील बदली झालेल्या शिक्षकांचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी उपलब्ध करून देऊ शकतात.
बदली पात्र शिक्षक महत्वाचे मुद्दे-
बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या ह्या त्यांच्या जिल्ह्यातील एकूण सेवाजेष्ठतेनुसार करण्यात येतील. ज्या शिक्षकांना कार्यरत शाळेवर सर्वसाधारण क्षेत्रात सलग पाच वर्ष व कार्यरत क्षेत्रामध्ये दहा वर्ष पूर्ण होत असतील तर अशा सर्व शिक्षकांचा समावेश बदली पात्र शिक्षकांमध्ये करण्यात येतो. बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी दिनांक 21 जानेवारी 2023 ते 24 जानेवारी 2023 दरम्यान आपला शाळांचा प्राधान्यक्रम भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध होईल. दिलेल्या मुदतीत फॉर्म सबमिट करुन काही चुका झाल्यास किंवा प्राधान्यक्रम बदलायचा असल्यास पुन्हा Withdraw करु शकता.मुदत संपण्यापूर्वी फॉर्म सबमिट झालेला असेल तरच तुमचे पसंतीक्रम विचारात घेतले जातील.
बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याकरिता चार दिवस
दिलेल्या आहेत त्याकरिता प्राधान्यक्रम भरण्याची घाई करू नये.
प्राधान्यक्रम भरताना-
बदली पात्र शिक्षकांनी खालील लिंकला क्लिक करावे.

https://ott.mahardd.in/

वरील लिंकला क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर व आपल्या मेसेज बॉक्समध्ये आलेला OTP टाकावा त्याखालील कॅप्च्या टाकून पोर्टल लॉगिन करावे.

सदर ही पोस्ट विन्सिन कंपनीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार व जीआरच्या आधारे तयार केलेली आहे या मताशी आपण सहमत असालच असं सांगता येणार नाही.
संवर्ग 4
बदली पात्र शिक्षकांनी बदलीसाठी पसंतीक्रम कसे भरावे ? सविस्तर माहिती-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *