सन्माननीय श्रीमती वर्षा ठाकूर – घुगे ( भा.प्र. से. ) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड डीजीऑल इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी फोर जेंडर इक्वलिटी : आंतरराष्ट्रीय महिला दिन 2023 निमित्त डीजीऑल एज्युकेशन वर्कशॉप फोर वुमन या नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकांसाठीच्या प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थिती लाभलेल्या कार्यक्रमात BHL Group ( बदलाव हम लायेंगे ग्रुप ) वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठीची शाळा : शाळेबाहेरची शाळा – माझी प्रयोगशाळेतील विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रिये बाबत श्री. संतोष केंद्रे,माजी आयटी विषय सहाय्यक, डायट नांदेड तथा शॉर्ट फिल्म राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक यांनी तयार केलेल्या शॉर्ट फिल्म बदल : The Change चे पोस्टर विमोचन सन्माननीय श्रीमती वर्षा ठाकूर – घुगे,( भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांच्या हस्ते करण्यात आले.
सोबतच मा. डॉ. गोविंद नांदेडे, पूर्व शिक्षण संचालक,महाराष्ट्र राज्य, मा. श्री. प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक, मा. डॉ. सविता बिरगे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक यांच्या प्रेरणा, मार्गदर्शन व उपस्थितीत करण्यात आले.