शासन सेवेत दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी च्या तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत.त्यानुसार जे राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांनी जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याबाबत विकल्प निवडतील, त्या प्रकरणी सदर अधिकारी / कर्मचारी यांची राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणून करावयाची कार्यपध्दती निश्चित करावयाची बाब शासनाचे विचाराधीन होती.
शासन परिपत्रक :
ज्या राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांनी जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याबाबत विकल्प निवडला असेल त्या प्रकरणी सदर अधिकारी / कर्मचारी यांची राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीचे सभासदत्त्व संपुष्टात आणून करावयाची कार्यपध्दती खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे :-
राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी लागू करण्याबाबत विकल्प संबंधित राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांच्याकडे सादर करावा. विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांनी संबंधित विकल्प अर्जाची तपासणी करुन प्रस्तुत कर्मचारी यांची नियुक्ती संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक २ अनुसार दि.०१.११.२००५ पूर्वीच्या जाहिरातीवर आधारित आहे हे निश्चित करुन असे प्रस्ताव नियुक्ती प्राधिकारी यांचेकडे सादर करावेत.
नियुक्ती प्राधिकारी यांनी संबंधित कर्मचारी हा अन्य सेवेतून आपल्या विभागातील सेवेत रुजू झाला आहे किंवा कसे याची खात्री करुन त्याची पूर्वीची सेवा राज्य शासनाच्या सेवेस जोडून देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत किंवा कसे याची निश्चितता करावी.
शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२४/प्र.क्र.१८/सेवा-४
ज्या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्याची सेवा जोडून देण्यात आलेली नाही, अशी तपासणी अंती खात्री झाल्यास नियुक्ती प्राधिकाऱ्याने प्रथम संबंधित कर्मचाऱ्याची सेवा जोडून देण्याचे प्रस्ताव प्राप्त करुन घेऊन संबंधित प्रशासकीय विभागामार्फत प्रस्ताव वित्त विभागास सादर करावेत. एकूणात सेवा जोडून दिल्यानंतरच
उक्त दि.०२.०२.२०२४ च्या आदेशामधील तरतूदीनुसार नियुक्ती प्राधिकाऱ्याने कार्यवाही करावी. यासंदर्भात असेही स्पष्ट करण्यात येते की, शासन परिपत्रक, क्रमांक संकीर्ण-२०१९/ प्र.क्र.३२०/सेवा-
४. दि.१३.११.२०२० अन्वये शासकीय कर्मचाऱ्याच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेच्या खात्यात जमा असलेल्या रकमेपुरता प्रान खाते जोडून देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. प्रस्तुत सूचना संबंधित कर्मचाऱ्याला दि.०२.०२.२०२४ च्या शासन निर्णयान्वये अनुज्ञेय ठरणाऱ्या लाभासाठी विचारात घेऊ नयेत. उपरोक्तप्रमाणे विकल्प निवडलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक प्राप्त
२.
झाल्यानंतर राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली मधील खाते तात्काळ बंद करण्याची कार्यवाही करावी.
अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीच्या प्रान (PRAN) खात्यातील संचित रक्कमेपैकी केवळ अधिकारी / कर्मचाऱ्याचे स्वतःचे अंशदान व त्यावरील लाभाची रक्कम त्याचे भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करणे व नियोक्त्याचे अंशदान व त्यावरील लाभाची रक्कम शासनाचे खाती जमा करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यपध्दती विहित करण्यात येत आहे –
३.
१) दि.०१.११.२००५ रोजी व त्यानंतर राज्य शासनामध्ये रुजू झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांना वित्त विभागाच्या दि.०२.०२.२०२४ अन्वये वरील योजना लागू करण्यात आले आहेत, अशा प्रकरणी राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीच्या खात्यातील संचित निधी परतावा मंजूर करण्यात यावा.
२) याबाबत संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्याने त्यांचे संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडे त्यांच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीच्या खात्यातील जमा अंशदान रक्कमेचा परतावा मिळण्याबाबत मागणी करावी.
३) आहरण व संवितरण अधिकारी यांनी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यास वरील योजना लागू झाल्याबाबत स्वयंस्पष्ट आदेशाची प्रत, त्यांच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीच्या खात्यावरील कर्मचाऱ्याचे अंशदान, नियोक्त्याचे अंशदान आणि त्यावरील लाभ यांच्या संपूर्ण तपशीलासह अधिकारी/ कर्मचाऱ्याचे राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणण्याचा प्रस्ताव
संबंधित कोषागार अधिकाऱ्याकडे सादर करुन त्यातील रक्कमांची मागणी करावी.
४) संबंधित कोषागार अधिकाऱ्यांनी अशा रक्कमांबाबत कोषागारातील अभिलेख आणि
Protean/NSDL च्या संकेतस्थळावरील रक्कम याची पडताळणी करावी.
५) अशा प्रकरणी नियोक्त्याचे अंशदान व त्यावरील लाभ संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यास देय ठरत नाहीत. केवळ संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्याचे स्वतःचे अंशदान आणि त्यावरील लाभ अनुज्ञेय ठरतात. त्यानुसार संबंधित अधिकारी / कर्मचा-याच्या “प्रान” (PRAN) क्रमांकावरील संचित (जमा झालेला) निधी संबंधित कोषागार अधिकारी यांनी केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण यांच्याकडे
ERM सुविधेद्वारे परत मिळण्याची मागणी करावी. ६) राज्य अभिलेख देखभाल अभिकरणाने संचित निधी मागविण्याच्या ERM प्रस्तावास मंजूरी द्यावी.
७) कोषागार अधिकारी यांनी प्राप्त रक्कमांचे दोन भाग करावेत. यातील प्रथम भाग म्हणजे संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्याचे स्वतःचे अंशदान व त्यावरील लाभ आणि दुसरा भाग म्हणजे शासनाचे अंशदान व त्यावरील लाभ.
८) यातील प्रथम भाग म्हणजे संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्याचे स्वतःचे अंशदान व त्यावरील लाभ, कोषागार अधिकारी यांनी मुख्य लेखाशिर्ष ८००९, राज्य भविष्य निर्वाह निधी, उपशीर्ष-०१,
पृष्ठ ६ पैकी २
शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०२४/प्र.क्र.१८/सेवा-४
लघुशिर्ष-१०१, सामान्य भविष्य निर्वाह निधी मध्ये चलनाने जमा करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडे वर्ग करावा.
९) त्यानंतर संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात सदरची रक्कम जमा करण्यासाठी महालेखापाल कार्यालयास प्रस्ताव सादर करावा, महालेखापाल कार्यालय सदर रक्कम जमा चलनाच्या आधारे संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्याच्या खात्यावर जमा करेल.
१०) कोषागार अधिकारी यांनी दुसरा भाग म्हणजे शासनाचे अंशदान व त्यावरील लाभ, राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील शासनाचे अंशदान “००७१-निवृत्तिवेतन व इतर सेवानिवृत्ती लाभांच्या संबंधातील अंशदानाच्या व वसुलीच्या जमा, (०१) नागरी, (१०१) अभिदाने व अंशदाने, (०१) अभिदाने व अंशदाने, (०१) (१४) परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाची समायोजनामुळे होणारी जमा रक्कम (००७१०२५३०१)” तसेच शासनाचे अंशदानावरील व्याज “००४९-व्याजाच्या जमा रकमा (०४) राज्य/ संघराज्य क्षेत्र विधानमंडळ असलेल्या शासनाच्या व्याजाच्या जमा रकमा, (८००) इतर जमा रकमा, (०१) इतर जमा रकमा, (०१) (५४) परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानावरील व्याज (००४९५१३४०१) खाली शासन लेख्यामध्ये जमा करावे.
४. जे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी हे सेवानिवृत्त झाले असून त्यांनी वरील योजना लागू करण्याबाबत विकल्प निवडला असेल, त्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत PRAN खात्यामध्ये जमा संचित रकमेचे प्रदान करण्यात आलेल्या प्रकरणी अनुसरावयाची कार्यपध्दती खालीलप्रमाणे आहे-
१) कर्मचाऱ्यास Pansion Fund Regulatory and Development Authority (Exits and Withdrawals Under the National Pension System) Regulations २०१५ आणि त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांन्वये कर्मचाऱ्याच्या PRAN खात्यामध्ये जमा संचित रकमेचे प्रदान Exit Withdrawal Process द्वारे करण्यात आले असल्यास, याबाबत कार्यालय प्रमुख आणि आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांचे स्तरावर प्रथम खात्री करावी.
२) ज्या प्रकरणी PRAN खात्यामधील संचित रकमेमधून वार्षिकी योजना (Annuity Plan) खरेदी करण्याची कार्यवाही निवृत्त कर्मचाऱ्यांकडून यापूर्वीच पूर्ण करण्यात आलेली असेल आणि संबंधितांना वार्षिकीचे (Annuity) नियमित प्रदान देखील सुरू झालेले असेल, अशा प्रकरणी निवृत्तिवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण (PFRDA) यांचे परिपत्रक क्रमांक PFRDA/२०२१/३०/SUP/ASP/६, दि.२२.०७.२०२१ अन्चये वार्षिकी समर्पित (surrender) करण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांस अनुसरून यथोचित निर्णय घेण्याची मुभा संबंधित निवृत्त कर्मचाऱ्यांना असेल. वार्षिकी समर्पण (surrender) करणे किंवा न करणेबाबत निवृत्त कर्मचाऱ्याने काहीही निर्णय घेतला तरी, संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांनी वार्षिकी योजना (Annuity Plan) खरेदी करण्यापूर्वी कर्मचा-याच्या PRAN खात्यामध्ये जी एकूण रक्कम संचित होती त्या एकूण संचित रकमेतील केवळ शासनाचे अंशदान व त्यावरील जमा लामाची रक्कम शासन लेख्यामध्ये जमा करणे अनिवार्य राहील,
३) सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या PRAN खात्यातील संचित रकमेतील कर्मचाऱ्याचे अंशदान व त्यावरील जमा लाभाची रक्कम आणि शासनाचे अंशदान व त्यावरील जमा लाभाची रक्कम याची स्वतंत्र परिगणना आहरण व संवितरण अधिकारी यांनी अधिदान व लेखा अधिकारी / जिल्हा कोषागार अधिकारी यांचेमार्फत केंद्रीय अभिलेख देखमाल अभिकरण (CRA-Protean) यांचेकडून प्राप्त करुन घेण्यात यावी.