दि.२० जुलै, २०२१ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक शाळांतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना लागू करण्यात आलेल्या त्रिस्तरीय वेतनश्रेणीच्या अनुषंगाने दयावयाच्या प्रशिक्षणामध्ये अंशत: बदल करुन ३ आठवडयाच्या सेवांतर्गत ऐवजी १० दिवसाचे अथवा घडयाळी ५० तासांचे (ऑनलाईन)
सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करण्याबाबत आदेश काढण्यात आले आहेत. सदरचे आदेश शासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षकांना लागू करण्याची बाब विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक शाळांतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना द्विस्तरीय व त्रिस्तरीय वेतनश्रेणी लागू करण्यासाठी संदर्भ क्र.१० येथील शासन निर्णयामधील सुधारित प्रशिक्षणाची अट शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांना तसेच मुख्याध्यापकांना लागू राहील.
२.दि.२० जुलै, २०२१ च्या शासन निर्णयामधील अ.क्र.१ ते ६ येथील अटी जशाच्या तशा शासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणा्या शिक्षक व मुख्याध्यापकांनी पूर्ण करणे आवश्यक राहील.
शासन निर्णय