राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांच्याकडून
दरमहा तारखेला जीवन शिक्षण मासिक प्रकाशित केले जाते. या मासिकाची सुरुवात स्वांतत्र्यपूर्व
काळात में १८६३ पासून झालेली असून १६१ वर्षाची गौरशाली परंपरा असलेले हे मासिक शालेय
शिक्षण विभागाचे मुख पत्र म्हणून ओळखले जाते, या मासिकात शिक्षण विभागाचे नवीन शैक्षणिक
प्रवाह, शेक्षणिक संशोधन, उपक्रम शील शिक्षक व शाळा याबाबतची माहिती
महाराष्ट्रातील शिक्षकांपर्यंत पोहचविण्यात येते. सर्व शिक्षकांसाठी आणि त्यातून ते अध्यापन करीत
असलेल्या विद्याथ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी या मासिकाचा फार मोठा हातभार आहे.
सदर मासिकामध्ये माहे फेब्रुवारीच्या अंकामध्ये मराठी राजभाषा दिन व
राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त विदयार्थ्याच्या स्व रचित कवितांना प्रसिद्धी देण्यात येणार आहे. तरी
आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त विदयार्थी, शिक्षक, पालक यांच्यापर्यंत या माहितीचा प्रसार करण्यात
यावा, तसेच विदयाथ्यांच्या स्वरचित कवितांचे संकलन करण्याची जबाबदारी जिल्हा समन्वयक,
जीवन शिक्षण (अधिव्याख्याताजेष्ठ अधिव्याख्याता, जिला शिक्षण व प्रशिक्षण संस्था ) यांच्यावर
सोपविण्यात अली आहे. जिल्हा समनव्यक यांनी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या स्व-चित कविता संकलित
करुन दि. १० जानेवारी २०२२ पर्यत जीवन शिक्षण विभागाच्या ई-मेलवर पाठवन्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.