दिनांक :- ०३ नोव्हेंबर, २०२२.
विषय : जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्गाच्या सन २०२२ मधील जिल्हांतर्गत बदल्यांबाबत…….
संदर्भ : १) शासन निर्णय क्र. जिपब-४८२०/प्र.क्र.२९०/आस्था-१४, दि.०७.०४.२०२१. २) शासनाचे समक्रमांकाचे दि.१९/०९/२०२२ व दि. २१/१०/२०२२ ची पत्रे.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी संदर्भीय दि.०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतूदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत (बदलीस पात्र असलेल्या / विशेष संवर्ग भाग-१ मधील / विशेष संवर्ग भाग- २ मधील शिक्षकांची यादी, निव्वळ रिक्त पदांची यादी. संभाव्य रिक्त पदांची यादी, जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे, इत्यादी) वेळोवेळी आपणास शासन स्तरावरुन निर्देश देण्यात आलेले आहेत.
२. शासनाच्या संदर्भीय क्र. १) येथील शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आलेल्या सुधारित धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु आहे. तसेच त्याकरिता दि. ३१/०८/२०२२ पर्यंत सेवानिवृत्त / निधन / अन्य कारणामुळे रिक्त झालेली पदे, त्याचप्रमाणे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केल्यानंतर झालेल्या रिक्त जागा झालेल्या रिक्त जागा, तसेच आंतरजिल्हा बदलीने रुजू झालेल्या शिक्षकांच्या समायोजनानंतर उर्वरित रिक्त पदे, संभाव्य रिक्त पदे याबाबतचा संपूर्ण तपशील ऑनलाईन शिक्षक बदली प्रणालीवर अद्ययावत करण्याचे संदर्भीय दि. १९/०९/२०२२ च्या पत्रान्वये कळविले आहे.
३. आता, संदर्भीय दि. २१/१०/२०२२ च्या पत्रान्वये जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून त्यानुसार बदल्यांची कार्यवाही माहे जानेवारी, २०२३ पर्यंत होणे अपेक्षित आहे. त्यामुळे सन २०२२ मधील जिल्हांतर्गत बदली प्रक्रीयेसाठी दि. ३१/१२/२०२२ पर्यंत सेवानिवृत्ती / निधन / अन्य कारणामुळे रिक्त झालेली / रिक्त होणारी संभाव्य रिक्त पदे विचारात घेऊन, ऑनलाईन शिक्षक बदली प्रणालीवर रिक्त पदांचा तपशील अद्ययावत करावा. तसेच, डिसेंबर, २०२२ अखेरपर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची नावे बदली प्रक्रियेतून वगळण्यात यावीत.