राज्यातील शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३ बाबत आयोजन, सविस्तर सूचना वितरण व अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांना सोपविण्यात आलेले आहेत. यानुसार २०२३-२४ दरम्यान शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा २०२३ साठी नियोजन करण्यात आलेले आहे.
नाव नोंदणी करण्यासाठी
सद्यस्थितीमध्ये प्रस्तुत स्पर्धेसाठी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या शाळातील शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक प्रशिक्षक यांचे कडून आवेदन स्वीकारण्याचे प्रक्रियेस मान्यता देण्यात आलेली आहे. यानुसार सदर स्पर्धेसाठी ऑनलाईन नावनोंदणीकरिता परिषदेमार्फत https://scertmaha.ac.in/vcomp2023/ ही ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. सदरील लिंकवर स्पर्धेत भाग घेण्यास इच्छुक शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक प्रशिक्षक यांनी नोंदणी करावयाची आहे.
स्पर्धेसाठी आवश्यक अटी :- (कृपया अटी काळजीपूर्वक वाचूनच अर्ज भरावा)
१. स्पर्धेकरिता नोंदणी करणेसाठी परिषदेच्या ऑनलाईन https://scertmaha.ac.in/vcomp2023/ या संकेतस्थळास भेट देवून आपली सर्व माहिती अचूक भरावी.
२. उमेदवारांना कोणत्याही एका गटासाठीच अर्ज सादर करावा. एका उमेदवारास एकापेक्षा जास्त अर्ज करता येणार नाहीत.
३. ज्या शिक्षकांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे त्यांना तालुका / जिल्हा/राज्य पातळीवरील निवड समितीत सदस्य म्हणून घेवू नये. याबाबतची खात्री संबंधित तालुका/जिल्हा/राज्य पातळीवरील निवड समितीने करावी.
४. स्पर्धेची नोंदणी व व्हिडीओ अपलोड प्रक्रिया दिनांक ०१ ऑगस्ट, २०२३ ते ३१ ऑगस्ट, २०२३ पर्यंत सुरु राहणार आहे. स्पर्धेची नोंदणी दिनांक ३१ ऑगस्ट, २०२३ रोजी रात्री १२.०० वाजता बंद होईल.
५. उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर व व्हिडीओ अपलोड संदर्भ क्र. १ चे निकषानुसार त्यांचे प्रथम तालुका स्तरावर मूल्यमापन होईल. तालुका स्तरावरील यशस्वी उमेदवार जिल्हा स्तरावरील मूल्यमापनासाठी पाठविण्यात येतील. त्यानंतर जिल्यातील यशस्वी उमेदवार राज्यस्तरीय मूल्यमापनासाठी पाठविण्यात येतील. असे सर्व ३६ जिल्यातील उमेदवारांमधून योग्य उमेदवार राज्यस्तरावर राज्य स्तरीय निवड समिती मार्फत निवडून त्यांना पारितोषिके देण्यात येतील..
६. यासाठी उमेदवारांना संबंधित जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतून पुढील सूचना देण्यात येतील.
७. प्रस्तुत स्पर्धेसाठी पुढीलप्रमाणे ०६ गट करण्यात आलेले आहेत
गट क्र. १- १ली व२री
गट क्र. २ – ३ री व ५ वी
गट क्र. ३-६ वी ते ८ वी
गट क्र. ४-९ वी ते १० वी
गट क्र. ५ ११ वी व १२ वी
गट क्र. ६ अध्यापक विद्यालय
८. स्पर्धेसाठी नावनोंदणी करतेवेळी शिक्षकाने पोर्टलवर शाळेची माहिती. शाळेचा UDISE क्रमांक, अचूक ई-मेल आय.डी, बँक खाते तपशील, व्हिडीओ लिंक इत्यादी माहिती सोबत ठेवावी.
९. स्पर्धेसाठी संबंधितांनी गटनिहाय भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, शिक्षक प्रशिक्षणाशी निगडीत आधुनिक विचार प्रवाह या विषयांपैकी आपला योग्य तो विषय निवडावा.
१०. नावनोंदणी करत असताना खालीलपैकी एका प्रकारावरील व्हिडीओ तयार करावा,
‘कोणत्याही सॉफ्टवेअरचा वापर करून स्वतः व्हिडीओ तयार करणे.
स्वतः स्क्रीन रेकोर्ड करून तयार केलेला व्हिडीओ स्वतः केलेला Animated व्हिडिओ
स्वतः पेन टॅबलेटचा वापर करून बनवलेला व्हिडीओ.
Degree / Simulations) वर आधारित व्हिडीओ खेळावर आधारित व्हिडीओ (Gamification) Immersive eContent (Augmented Reality Virtual Reality ई- चाचणीवर आधारित व्हिडीओ (E-assessments) Virtual Lab/350 शासन प्रणालीवर आधारित बोलीभाषेतून केलेला व्हिडीओ दिव्यांगत्व प्रकारानुसार अध्ययनासाठी व्हिडीओ
राज्य / राष्ट्रीय शिष्यवृत्ती वर आधारित व्हिडिओ
उत्कृष्ट व्हिडीओ निवडीचे निकष
उत्कृष्ट व्हिडीओ निवडीचे निकष
व्हिडीओ निर्मिती साठी आवश्यक आशय मजकूर आदर्श असावा. व्हिडीओ हा विद्यार्थी वयोगट विचारात घेऊन निर्मित केलेला असावा.व्हिडीओ ची साईज हि विद्यार्थी किंवा इयत्तेनुसार असावी. निर्मित व्हिडीओ मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असेल तर उत्तम. व्हिडिओमधील मजकूर, चित्रे, रंगसंगती अचूक व योग्य असावीत.शिक्षकांनी स्वतः केलेले व्हिडीओ चित्रीकरण, सादरीकरण, एडिटिंग इत्यादी बाबींना महत्व असेल. आवाजात सुस्पष्टता असावी. आवाजाची / बोलण्याची गती योग्य प्रमाणात असावी. आवाज आरोह-अवरोह युक्त असावा. बँकग्राउंड नॉईज नसावा. जर बॅकग्राउंड म्युझिक घेणार असाल तर ते कमी आवाजात असावे. बॅकग्राउंड म्युझिक व आवाज हे स्लाईडच्या आशयाशी संबंधित असावे.
व्हिडीओ निर्मितीसाठी महत्वाच्या बाबी.
शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारितच व्हिडीओ बनविणे आवश्यक आहे. वरील व्हिडीओ अध्ययन-अध्यापन प्रणालीशी निगडीत असणे आवश्यक
व्हिडिओ बनविणार्याने स्वतः चा थोडक्यात परिचय समावेश करावा. व्हिडीओ कन्टेन्ट निर्मिती करणाऱ्या शिक्षकाचे नाव, शाळा, पत्ता या बाबी व्हिडिओमध्ये समाविष्ठ करू नयेत.