गटशिक्षणधिकारी पंचायत समिती सर्व, जिल्हा नांदेड..
विषय : प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदली सन २०२२ करीता माहिती सादर करून वेळापत्रकानुसार कार्यवाही करणे बाबत. संदर्भ : ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक : जिपन- २०२२/ प्र.क्र. २९/आस्था-१४ दिनांक
२०/१०/२०२२ उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, प्राथमिक शिक्षकांच्या सन २०२२ च्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या अनुषंगाने ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे. वेळापत्रकातील तारखानुसार जिल्हांतर्गत बदली विषयी योग्य ती कार्यवाही करावयाच्या सुचना आहेत. वेळापत्रकातील सूचनेनुसार १) संवर्ग ०१ च्या पात्र याद्या २) संवर्ग २ च्या पात्र याद्या ३) बदली पात्र शिक्षक पात्र याद्या ४) बदली अधिकार प्राप्त शिक्षक पात्र याद्या ५) रिक्त पदांच्या याद्या प्रसिद्ध करावयाच्या आहेत तरी वरील सर्व ५ प्रकारच्या अंतिम याद्या दिनांक २२/ १० / २०२२ रोजी या कार्यालयामध्ये सादर कराव्यात. संदर्भीय पत्र सोबत देण्यात येत आहे. या संदर्भीय पत्राचा व्यवस्थित अभ्यास करून जिल्हांतर्गत बदलीची आपल्या स्तरावरची कार्यवाही पूर्ण करावी विलंबाची जबाबदारी आपणांवर राहील याची दक्षता घ्यावी.अशा प्रकारचे पत्र काढून जिल्हांतर्गत बदली प्रकिया सुरळीत पार पडावी या दृष्टीने डॉ. सविता बिरगे शिक्षणाधिकारी जि प नांदेड यांचे प्रयत्न दिसून येत आहेत.