जिल्हा परिषद शिक्षक जिल्हाअंतर्गत बदलांसाठी शासन निर्णयाने विहित करण्यात आलेल्या सुधारित धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदलाबाबतची कार्यवाही सुरू आहे दिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोजीच्या शासनपत्रांमुळे सन 2022 मधील जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेसाठी 31 डिसेंबर 22 पर्यंत सेवानिवृत्त निधन अन्य कारणामुळे रिक्त झालेल्या रिक्त अथवा संभाव्य रिक्त पदे विचारात घेऊन ऑनलाईन शिक्षक बदली प्रणालीवर रस्ते पदांचा तपशील अद्यावत करावा तसेच डिसेंबर 2022 अखेर पर्यंत न्यू सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची नावे बदली प्रक्रियेतून व देण्यात यावी अशा सूचना देण्यात आले आहेत.
आता संदर्भीय दिनांक 31 जानेवारी 2023 च्या पत्रानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्याबाबतचे सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून त्यानुसार बदलांची कार्यवाही फेब्रुवारी 2023 पर्यंत होणे अपेक्षित आहे सदर बदली प्रक्रियेमध्ये जिल्हाअंतर्गत बदल्या झालेल्या शिक्षकांना शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर कार्यमुक्त करण्याचे विचाराधीन आहे.
याकरिता सन 2022 मधील जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेसाठी दिनांक 30 एप्रिल 2023 पर्यंत सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या संभाव्य पदे विचारात घेऊन ऑनलाइन शिक्षक बदली प्रणालीवर अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त जागा भरण्याच्या राऊंडसाठी रिक्त पदांचा तपशील अद्यावत करावा तसेच एप्रिल 2023 अखेरपर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची नावे बदली प्रक्रियेतून वगळण्यात यावी असे निर्देश ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.