अवघड क्षेत्रातील बदली प्रक्रियेसाठीही प्राधान्यक्रम भरता येणार|संवर्ग १ मधील शिक्षकांना मिळणार नकार देण्याची पुन्हा एक संधी.

संवर्ग एक मधील शिक्षकांना मिळणार नकार भरण्याची पुन्हा एक संधी.

अवघड क्षेत्रातील बदली प्रक्रियेसाठीही प्राधान्यक्रम भरता येणार! 

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने आज दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या 2022 मधील जिल्हाअंतर्गत बदली संदर्भात निर्देश दिले आहेत.

अंतर्गत बदलीचा अवघड क्षेत्रातील जागा भरण्याचा राऊंड सुरू झाला होता व त्यानुसार अवघड क्षेत्रात त्यांची बदली होईल अशा शिक्षकांच्या याद्या देखील जिल्हा परिषद कडून ऑनलाईन पोर्टलवरून प्रकाशित करण्यात आल्या होत्या.

परंतु सदर याद्यांमध्ये बऱ्याचशा संवर्ग एक मधील शिक्षकांची नावे तसेच ज्यांची सेवा अगदी शेवटच्या टप्प्यात आहे अशा शिक्षकांची नावे आलेली होती.

असे शिक्षक व काही शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी माननीय आयुष प्रसाद बदली समिती अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांना भेटले व त्यांना सदर बाबतची निवेदने सादर केली सदर बाबीवर गांभीर्याने विचार करून माननीय आयुष प्रसाद साहेबांनी त्यांचा अभिप्राय ग्रामविकास विभागाला कळवला आणि त्यानुसार आजचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे.

सदर यादीतील त्रुट्या दूर करण्यासाठी जे शिक्षक संवर्ग एक मध्ये आहेत व त्यांना वयाची 53 वर्षे पूर्ण झालेली आहेत अशा शिक्षकांसाठी संवर्ग एक मधून नकार देण्यासाठी पुन्हा एकदा पोर्टलवर संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. व त्यानंतर अवघड क्षेत्रातील तरी जागा भरण्यासाठी ची यादी पुन्हा प्रकाशित होणार आहे.

त्याचप्रमाणे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात कोणती होणार आहे अशा शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्या शिक्षकांना बदली पोर्टलवर आपला प्राधान्यक्रम भरण्यासाठी देखील संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या संदर्भात ग्रामविकास विभागाने पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *