तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपतेय का?या सेटिंग करा बॅटरी जास्त चालेल

तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपतेय का?या सेटिंग करा बॅटरी जास्त चालेल

स्मार्टफोनचा होत असलेला अतिरिक्त वापर,वाढती गरज यामुळे स्मार्टफोन जसा जुना होतो तशी त्याची बॅटरी लवकर संपत जाते.आणि यामुळे स्मार्टफोन लवकर लवकर चार्ज करावा लागतो, सतत चार्जर सोबत घेऊनच फिरावे लागते.पण आपण आपल्या स्मार्ट फोनच्या काही सेटिंग बदळूनही बॅटरी बॅकअप वाढवू शकतो. आज आपण अशाच काही पद्धती पाहू या ज्या केल्याने आपल्या स्मार्टफोनच्या बॅटरी चे व स्मार्टफोन चे आयुष्य वाढू शकते.

  1. व्हायब्रेशन मोड बंद करा: इन्कमिंग कॉल ते फोनमध्ये टायपिंग करण्यापर्यंत बरेच लोक व्हायब्रेशन मोड चालू ठेवतात. यामुळे आपल्या फोनची भरपूर बॅटरी खर्च होते. ते बंद ठेवल्याने तुमच्या बॅटरीचे आयुष्य वाढेल तसेच ती एकदा चार्ज केल्यानंतर दीर्घ काळ चालेल.
  2. वॉलपेपर : तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, फोनमध्ये काळा वॉलपेपर लावून बॅटरी वाचवता येते. वास्तविक, वॉलपेपरमध्ये जितके अधिक रंग असतील तितकी ते दाखवण्यासाठी स्मार्टफोनची बॅटरी जास्त खर्च होईल. तसेच डार्क मोड ऑन करून देखील स्मार्टफोनची बॅटरी चांगली टिकवता येते.
  1. हे बंद ठेवा: ब्लूटूथ, जीपीएस आणि वायफाय सारख्या सेटिंग्ज बंद ठेवा चालू असतात. हे सर्व सेटिंग सतत बॅटरी वापरतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही त्यांचा वापर करत नसाल तेव्हा त्यांना बंद ठेवलेले चांगले.
  2. ऑटो सिंक बंद ठेवा: Gmail पासून Twitter आणि Photos पर्यंत, Photos सारखी ऍप्स डेटा सतत रिफ्रेश करत राहतात. यामुळे फोनची बॅटरी आणि मोबाईल डेटा दोन्ही खर्च होतो. फोनच्या सेटिंग्जवर जा, गुगल अकाउंटवर जा आणि ऑटो सिंक फीचर बंद करा.
  3. ब्राइटनेस कमी ठेवा: फोनचा ब्राइटनेस कमी ठेवल्याने बॅटरीची बचत होते. फोनचा ब्राइटनेस खूप जास्त असल्यास फोनच्या बॅटरीचा वापर वाढतो. विशेष बाब म्हणजे आता बहुतेक फोन्समध्ये डार्क मोड आला आहे, ज्यामुळे बॅटरी वाचण्यास खूप मदत होते.
  4. मोबाईल सतत जास्त वेळ चार्जिंग लावून ठेवू नका.
  5. प्रत्येक अँपचा वापर झाला की ते व्यवस्थित बंद करा. कारण बॅकग्राऊंड ला अँप चालू राहून सुद्धा आपल्या फोनची बॅटरी लवकर संपते
  6. सतत मोबाईलचा इंटरनेट डेटा ऑन ठेवल्यानेही मोबाईलची बॅटरी लवकर संपते. तेव्हा आवश्यकता नसेल तेव्हा data बंद ठेवा.
  7. नोटिफिकेशन बंद ठेवा- फोनला असलेले नोटिफिकेशन बंद ठेवा त्यामुळे सुद्धा तुमच्या स्मार्टफोन ची बॅटरी सेव्ह होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *