कॉम्प्युटरच्या क्षेत्रात दररोज नवनवीन तंत्रज्ञान बाजारात येत असल्याने, कोणता संगणक घ्यायचा कोणता संगणक चांगला आहे हे ठरवता येत नाही.आणि जर तुम्ही नवीन संगणक बाजारातून घेण्याच्या विचारात असाल तर खरेदी करण्यापूर्वी काही मूलभूत गोष्टी जाणून घ्या. त्यामुळे तुम्हाला संगणक खरेदी करताना सोपे होईल.
संगणक घेताना या बाबी पहाव्यात
प्रोसेसर
आजकाल बाजारात अनेक प्रगत प्रोसेसर उपलब्ध आहेत, जसे की Core i5, Core i7 (Core i 7) जर तुम्हाला स्वतःला घरी संगणक वापरायचा असेल तर प्रोसेसरच्या वेगातील फरक जाणून घ्यावा लागेल. बेसिक कामासाठी आपण Core i3 किंवा Dual Core देखील निवडू शकता, ते Core i5, Core i7 च्या तुलनेत खूपच स्वस्त आहेत.
तुमचा जुना Pentium4 किंवा DualCore cpu i3 किंवा i5 मध्ये रूपांतरित सुद्धा करता येतो
RAM (RAM)
रॅम तुमच्या कॉम्प्युटरला वेगात चालवण्यासाठी मदत करतो, सोप्या भाषेत सांगायचे तर तुमच्या कॉम्प्युटरची रॅम जितकी जास्त असेल तितकी हँग होण्याची शक्यता कमी असते, आपणास बऱ्यापैकी स्पीड हवी असेल तर आपण कमीतकमी 4 GB RAM निवडावा.त्यापेक्षा जस जसे तुम्ही RAM वाढवत जाल तसं तशी तुमच्या संगणकाची स्पीड वाढणार आहे.तसेच किंमत ही वाढणार आहे
ग्राफिक कार्ड
ग्राफिक कार्डमुळे तुम्ही लॅपटॉपवर वेब ब्राउझिंग, चित्रपट आणि गेमचा आनंद घेऊ शकता, त्यामुळे जर तुम्हाला तुमची दैनंदिन कामे MS Office सारखी करायची असल्यास.तुम्हाला ग्राफिक्स कार्डची आवश्यकता नाही पण जर तुम्हाला वेब ब्राउझिंग, चित्रपट आणि गेम खेळायचे असल्यास ग्राफिक कार्ड आवश्यक आहे.
हार्ड डिस्क ड्राइव्ह
घर आणि ऑफिसमध्ये वापरात येणाऱ्या संगणक यांच्यामध्ये फरक आहे. ऑफिसमध्ये आपण बहुतेक वर्ड आणि एक्सेल सारख्या ऍप्लिकेशन्सवर काम करतो, त्यांच्या फाईल्स जास्त जागा व्यापत नाहीत, पण घरी, कॉम्प्युटरवर काम करण्यासोबतच आपण गेम्स, फोटो, मूव्हीज देखील सेव्ह करत असतो. ज्यासाठी जास्त जागा लागते. आज काल मोबाईल मध्ये काढलेले फोटो आणि विडिओ ची क्वालिटी खूप चांगली झालेली आहे व हे फोटो विडिओ आपण संगणकामध्ये सेव्ह करत असाल तर त्याला जागा जास्त लागणार आहे.त्यामुळे आपणास हार्ड डिस्क (हाय कॅपेसिटी हार्ड डिस्क) निवडावी लागेल. त्यामुळे, हार्ड डिस्क ड्राइव्ह अतिशय काळजीपूर्वक निवडा, आजकाल 500 GB ते 2000 GB पर्यंतची हार्ड डिस्क बाजारात उपलब्ध आहे.
स्क्रीन आकार
लॅपटॉप घेत असताना बरेच लोक मोठ्या स्क्रीनच्या लॅपटॉप निवडतात, परंतु स्क्रीनचा आकार पाहून कधीही लॅपटॉप निवडू नका, आपली गरज लक्षात घ्या कारण स्क्रीनचा आकार मोठा असल्यास, लॅपटॉप जड असू शकतो, तसेच डिस्प्ले कमी रिझोल्यूशन असल्यास तर संगणकीय अनुभव देखील वाईट असू शकतो. त्यामुळे चांगल्या रिझोल्युशनच्या स्क्रीनला प्राधान्य द्या, स्क्रीन रिझोल्यूशन पहावे. डेस्कटॉपसाठी, तुम्ही तुमच्या सोयीनुसार स्क्रीनचा आकार निवडू शकता, जरी मध्यम आकाराचा 18.5 इंचाचा डिस्प्ले आपणास योग्य असणार आहे. परंतु जर तुम्हाला संगणकावर चित्रपट पाहण्याची आवड असेल किंवा तुम्हाला टीव्ही ट्यूनर लावून टीव्ही पाहायचा असेल तर मात्र, 22 इंच मॉनिटर घेणे योग्य राहील.