फोनमध्ये स्टोरेजचा त्रास होत असेल तर हा आहे उपाय, फोन जलदगतीने चालेल.

फोन नाही असा माणूस आता सध्या शोधून सुद्धा सापडणार नाही.आणि आपल्या फोन मध्ये फोटो आणि व्हिडिओ त्याच बरोबर अनेक महत्त्वाचे अॅप्सही सोबत असतात. फोन हा आज आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे, परंतु अनेक वेळा या फोनमुळे आपल्याला समस्या येऊ लागतात. कधी मोबाईल हँग होतो तर कधी स्टोरेजची अडचण निर्माण होते. आणि जर तुम्हाला नेहमीच फोनच्या स्टोरेजचा प्रश्न निर्माण होत असेल तर आम्ही तुम्हाला मोबाईलच्या अतिरिक्त स्टोरेजच्या समस्येपासून मुक्त कसे व्हावे हे सांगणार आहोत. चला जाणून घेऊया…

कॅशे डिलीट करा:

फोनमधील कॅशे डिलीट करून, स्टोरेज देखील कमी करता येते. यासाठी तुम्हाला फोनच्या सेटिंग मध्ये स्टोरेजमध्ये जाऊन अॅप ओपन करू शकता आणि कॅशे क्लिअर करू शकता. कॅशे ही एक तात्पुरती फाइल असते जी फोन संग्रहित करत असतो. फोनच्या स्टोरेजमध्ये जाऊन संपूर्ण कॅशे फाइल एकाच वेळी डिलीट करता येतात.

क्लाउड स्टोरेज वापरा:

फोनमधील जास्तीत जास्त मेमरी फोटो आणि व्हिडिओमध्ये वापरली जाते, त्यामुळे स्टोरेज वाचवण्यासाठी Google Photos किंवा इतर क्लाउड स्टोरेज सेवा वापरणे आणि फोनच्या स्टोरेजला मोकळीक देणे चांगले. आता अनेक मोबाईल कंपन्या क्लाउड स्टोरेज देखील देत आहेत. यामुळे तुम्ही फोनऐवजी तुमच्या फाइल सर्व्हरवर ठेवण्यासाठी क्लाउड स्टोरेज वापरू शकता.

कामाचेच कमी App मोबाईल मध्ये ठेवा

आपण आपल्या मोबाईल मध्ये खूप सारे app जर ठेवले तर Ram वर ताण येतो व स्टोरेज सुद्धा व्यापले जाते.त्यामुळे महत्वाचे व दररोज लागणारेच App मोबाईल मध्ये ठेवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *