ख्रिसमस किंवा नाताळ हा ख्रिस्ती सण आहे. हा सण दर वर्षी २५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. ह्या दिवशी ख्रिस्ती बांधवांचे लाडके प्रभू येशू यांचा जन्म झाला होता. काही ठिकाणी हा सण ६, ७ किंव्हा १९ जानेवारी ला एपिफानी म्हणून साजरा करतात. हा सण १२ दिवसांचा असून ख्रिसमस्टाईड पर्वाची सुरुवात होते. जगभरात हा सण साजरा होतो. काही ठिकाणी मध्यरात्री हा सण साजरा केला जातो. तर काही ठिकाणी संध्याकाळी हा सण साजरा केला जातो.
नाताळ हा शब्द नातूस म्हणजे जन्म या लॅटिन शब्दापासून बनला आहे. या दिवसाला इंग्रजी भाषेत ख्रिसमस म्हणतात. ख्रिसमस म्हणजे ख्रिस्तमहायज्ञ (मिस्सा). ख्रिस्त महागुरुंना ख्रिस्तमसच्या दिवशी तीन मिस्सा अर्पण करण्याची परवानगी दिली गेली. ख्रिस्ताच्या जन्मघटकेचे स्मरणार्थ पहिला मिस्सा मध्यरात्री अर्पण केला जाते. ख्रिस्ताचा जन्म मध्यरात्री झाला अशी मान्यता आहे.
दुसरा मिस्सा पहाटे व तिसरा मिस्सा दिवसात अर्पण केला जात असे.
मध्यरात्रीचा मिस्सा बेथलहेम येथे अर्पण केला जाते. हे इस्राईल देशातील एक छोटंसं गावं आहे. ह्याच गावात ख्रिस्तांचा (प्रभू येशूचा) जन्म झाला. ह्या दिवशी इथून लोकं रात्रीच्या समयी मिरवणूक काढून जेरूसेलम गांवी पहाटेच्या सुमारास पोहोचतात. तिथे दुसरा मिस्सा अर्पण केला जातो. नंतर दिवसाढवळी महामंदीरात सर्व ख्रिस्ती बांधव एकत्र होतात त्यावेळी तिसरा मिस्सा अर्पण होत असे.
गोवा या ठिकाणी तर नाताळची धुम फार अनोख्या पध्दतीने पहायला मिळते. हा सण साजरा करण्याकरता कित्येक पर्यटक देश विदेशातुन आणि आपल्या भारतातुन देखील गोवा येथे येतात. सुट्टीचा मनमुराद आनंद लुटतात. गोव्याचे समुद्रकिनारे तर माणसांच्या गर्दीने फुलुन जातात. गोवा येथे अनेक जुने चर्चेस देखील आहेत त्यामुळे सुध्दा येथील नाताळ फार रंगीबेरंगी पध्दतीने साजरा होतांना दिसतो.
नाताळच्या दिवशी चर्च मधे विशेष प्रार्थना होते. माणसं आपल्या नातेवाईंकांना आणि मित्रमंडळींना भेटण्याकरता एकमेकांकडे जातात, भेटवस्तंुचे आदानप्रदान होते.
ख्रिसमसच्या दिवशी आपल्या अंगणात ख्रिसमस ट्रि लावल्या जातात त्याला देखणं रूप दिलं जातं. घरावर रोषणाई केली जाते. या दिवशी केकचे विशेष महत्व असते. आलेल्यांना केक भरवणे फार जुनी परंपरा आहे एकमेकांना केक भरवुन नाताळच्या शुभेच्छा दिल्या जातात.