मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागात मेगा भरती,मिळणार भक्कम पगार

Santosh Kendre | zpguru.in | Updated: Dec 6
मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या १६४ जागांची भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना १० डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. नोटिफिकशेनमध्ये याची सविस्तर माहीती देण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी कंत्राटी भरती केली जाणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांची भरती केली जाणार आहे. या अंतर्गत ३४ विभागांमध्ये एकूण १६४ जागा भरण्यात येणार आहेत. विभागानुसार रिक्त पदांची संख्या आणि त्यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

उमेदवाराकडे नॅशनल मेडीकल कमिशन अंतर्गत शिक्षक पात्रता आणि मेडीकल इंस्टिट्यूशन रेग्युलेशन २०२१ तसेच टीईटी रेग्युलेशन २०२१, १४ ऑगस्टनुसार शिक्षण पूर्ण असणे गरजेचे आहे. तसेच सुपर स्पेशालिटी डीए/एमसीएच, एमडी/एमएस,डीएनबी तसेच संबंधित विषयाचा एक वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. यासोबतच एमएससीआयटी आणि मराठी भाषेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

ही पदभरती ३ जानेवारी ते ३० जून २०२२ या कालावधीसाठी असणार आहे. या पदांसाठी उमेदवाराचे वय ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. तसेच उमेदवारांकडून ५२५ रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ८० हजार ते १ लाखापर्यंत पगार मिळणार आहे.

अर्ज कोठे करायचा?

सेक्शन, तळमजला, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज बिल्डिंग, सायन, मुंबई- ४०००२२

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख:-.१० डिसेंबर २०२१

उशिरा आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. मुलाखतीच्या संदर्भातील अपडेट नायर हॉस्पीटलच्या नोटीसबोर्डवर लावण्यात येणार आहे.

संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *