हॅकर्स काही सेंकदात रिकामे करू शकतात तुमचे बँक अकाउंट, सुरक्षेसाठी अशी घ्या काळजी
संतोष केंद्रे-नांदेड
हल्ली ऑनलाइन आर्थिक व्यवहार जसे वाढले आहेत त्याच बरोबर फसवणुकीचे प्रकार सुद्धा वाढले आहेत. सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत असतात.
गेल्या काही दिवसात डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. स्मार्टफोन व इंटरनेटमुळे सहज ऑनलाइन पेमेंट केले जात आहे. यामुळे रोख रक्कम काढण्यासाठी बँकेत अथवा एटीएम समोर उभे राहावे लागत नाही. मात्र, ऑनलाइन व्यवहार जेवढे सोपे आहेत, तेवढेच ते करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
डिजिटल ट्रांजॅक्शन्ससह सायबर फ्रॉड आणि क्राइम देखील खूप वेगाने वाढत आहे. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार आणि बँक खाते सुरक्षित ठेवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
सायबर गुन्हेगार हे आपल्याला बँकेचे आधिकारी, विमा एजेंट, आरोग्य सेवा अथवा दूरसंचार कर्मचारी आहोत असे सांगून आपणास फोन करतात. त्यानंतर वेगवेगळ्या स्कीम, लॉटरीकिंवा आपले बँक अकाउंट बंद करण्याची, लॉक करण्याची भिती दाखवून आपली खाजगी माहिती काढून घेतात.
तसेच काही बनावट app च्या माध्यमातून ही आपली फसवणूक होत असते तर आपण नक्की कोणती काळजी घ्यायला हवी.
ऑनलाईन व्यवहार करताना किंवा इतर इंटरनेट वर क्रिया करताना आपणास ओटीपी (OTP-One Time Password ) दिला जातो.असा कोणताही ओटीपी आपण इतरांना share करू नये
आपली कोणतीही खाजगी माहिती इतरांना शेयर करू नये.
ATM किंवा क्रेडीट कार्ड पिन इतरांना सांगू नये.
बँक कधीही आपणास ओटीपी किंवा खाजगी माहिती मागत नाही
बनावट लिंकपासून सावध रहा-अनेक अनोळखी लिंक आपणास व्हाट्सअप्प, फेसबुक इतर ठिकाणी येत असतात त्या क्लिक करू नये.
खात्रीशीर वेबसाईट व App मध्येच ऑनलाइन पेमेंट करावे, अनोळखी किंवा पसव्या पोर्टलवर किंवा app मध्ये पेमेंट करू नका
बाजारात ,गर्दीमध्ये पेमेंट करताना शक्य तो आपला पिन इतरांना दिसणार नाही याची काळजी घ्या
ATM किंवा क्रेडिट कार्ड च्या पॉकेट मध्ये पिन लिहून ठेवू नका
फ्रॉड झाल्यास किंवा ATM ,क्रेडिट कार्ड्स हरवल्यास ते त्वरित ब्लॉक करा.बंद करण्यासाठी आपण कॉल सेंटर किंवा होम ब्रँच मध्ये जाऊ शकता.
अधिकृत app चा वापर करा
फसव्या जाहिरातीला बळी पडू नका