महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषदांच्या सर्व प्राथमिक शाळांत सर्वासाठी शिक्षणाचे सूक्ष्म नियोजन, सतत उपस्थिती टिकवणे व शिक्षणाचा दर्जा उंचावण्याकरीता ४८६० केंद्रीय प्राथमिक शाळा
शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.८१/टिएनटि-१
स्थापन करुन १० जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसाठी एक केंद्र प्रमुखांचे पद निश्चित करण्याबाबतचा निर्णय उक्त संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये घेण्यात आला. त्यानुसार एकूण ४८६० केंद्र प्रमुखांची पदे निर्माण करण्यात आली आहेत. शासन निर्णय दिनांक ०२.०२.२०१० अन्वये केंद्र प्रमुख पद भरतीचे प्रमाण सरळसेवा पदोन्नती व विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे अनुक्रमे ४०: ३०:३० या प्रमाणात निश्चित करण्यात आले. त्यानुसार ग्राम विकास विभागाने दि. १०.०६.२०१४ रोजी अधिसूचनेन्वये केंद्रप्रमुखाचे सेवाप्रवेश नियम प्रसिध्द केले. संदर्भ क्र.८ येथील शासन निर्णयान्वये सदर पदे भरणेबाबतची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली. परंतु सदर कार्यपध्दतीनुसार पदे भरली जात नाहीत, असे शासनाच्या निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे १०० टक्के पदे भरण्यासाठी सदर भरतीचे प्रमाण बदलून ५० टक्के पदे पदोन्नतीने व ५० टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती..
शासन निर्णय:
केंद्र प्रमुख पदभरती संदर्भात यापूर्वी पारीत करण्यात आलेला शासन निर्णय दिनांक १६.०२.२०१८ अधिक्रमित करण्यात येत आहे व याबाबतीत तद्नुषंगिक शासन निर्णय / शासन शुध्दीपत्रक अधिक्रमित करण्यात येत आहेत..
०२. केंद्र प्रमुखाची सद्यस्थितीत रिक्त असलेली पदे तसेच सेवानिवृत्ती, राजीनामा, बडतर्फी इत्यादी कारणांनी यापुढे रिक्त होणाऱ्या पदावर ती पदे जसजशी रिक्त होतील, तसतशी ५० टक्के पदे पदोन्नतीने व ५० टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे त्या त्या कोट्याच्या मर्यादेत भरण्यास
मान्यता देण्यात येत आहे.
०३. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी त्यांच्या जिल्हयातील उर्दू शाळांची संख्या विचारात घेऊन केंद्रप्रमुखाची पदे निश्चित करावीत..
०४. केंद्रप्रमुखांची रिक्त पदे विभागीय मर्यादीत स्पर्धा परीक्षा तसेच पदोन्नतीने भरण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी:- ४.१ विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा:- विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा
परिषदेमार्फत घेण्यात येईल.
४.२ परीक्षेचे आयोजन व स्वरुपः- विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षाद्वारे केंद्रप्रमुखाच्या निवडीसाठी अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन शासन निश्चित करेल, अशा परीक्षा यंत्रणेमार्फत आयोजित करण्यात येईल. सदर परीक्षा यंत्रणेकडून राज्यातील सर्व जिल्ह्यामधील परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात येतील. या चाचणी परीक्षेचे आयोजन व स्वरुप खालीलप्रमाणे राहील:-
पृष्ठ ८ पैकी २
शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.८१/टिएनटि-9
१. अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात येईल. अर्थात विषयनिहाय चाचणी घेतली
जाणार नाही. सदर परीक्षा आवश्यकतेनुसार ऑनलाईन / ऑफलाईन पध्दतीने घेण्यात येईल. सदर परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल.
२. ऑनलाईन परीक्षा घेताना समान काठिण्य पातळीच्या किमान १० प्रश्नपत्रिका संच सदर
परीक्षा यंत्रणा तयार ठेवेल. परीक्षार्थ्यांना समान काठिण्यपातळीचे विविध प्रश्नपत्रिका देण्यात येतील.
३. उपलब्ध रिक्त पदे विचारात घेऊन सदर परीक्षा घेण्यात येईल.
४. परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक परीक्षा परीषदेमार्फत जाहीर करण्यात येईल.
४. ३ परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रम:- परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल. परीक्षेचे माध्यम गुणवत्तेसाठी विचारात घेतले जाणार नाही. सदर परीक्षा एकूण २०० गुणांची राहील व त्यासाठी दोन तासाचा कालावधी राहील. परीक्षेसाठी पुढीलप्रमाणे घटक व गुणांकन राहील.
- जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक
- शिष्यवृत्ती परीक्षा आवेदन पत्र भरणे सुरू
- राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ चे आयोजन करणेबाबत….
- दर्जेदार व्हिडियो निर्मिती स्पर्धा 2023 तालुका व जिल्हास्तर निकाल
- शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ राज्यस्तर पुरस्कार प्राप्त उमेदवार यादी