MPSC परीक्षा 2022 वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.अधिक माहिती घेऊ या.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

MPSC(महाराष्ट्र लोकसेवा आयोग) मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. जानेवारीमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे.

लोकसेवा आयोगाने आगामी वर्षातल्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०२२ मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्यसेवा परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा , महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा , महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा , महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा व इतर परीक्षा पुढील वर्षी करण्यात येणार आहेत.

टीप:-
1.शासनाकडून संबंधीत संवर्ग पदासाठी विविध वेळेत मागणी पत्र प्राप्त होणार आहे. या लेखाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे .शासनाकडून विहित वेळेत मागणी पत्र प्राप्त झाल्यास तसेच नियोजित महिन्यांमध्ये पदे विद्यापीत करणे व वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल
2.वेळापत्रक अंदाजीत असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना/दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
3.अंदाजित वेळापत्रक याबाबतची सद्यस्थिती दर्शविणारी अद्यावत माहिती वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
4.संबंधित परीक्षेचे परीक्षा योजना अभ्यासक्रम निवड पद्धत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला येईल व आयोगाच्या धोरणानुसार वेळोवेळी अद्यावत करण्यात येईल.
5.संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्या बाबतचा सविस्तर तपशील जाहिरात अधिसूचनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *