आयकर विभाग आपल्या डेटामध्ये फक्त पॅन कार्ड धारकांच्या आडनाव ठेवतो. म्हणूनच पॅन नंबर मध्ये देखील त्याची माहिती असते. … त्यामुळे संबंधित व्यक्तीची टॅक्स भरण्याची प्रक्रिया किंवा क्रेडिट कार्डद्वारे केलेली आर्थिक व्यवहार या सर्वांवर आयकर विभागाची नजर असते. पॅन कार्ड मधील दहा अंकी कोड चे पहिले तीन अंक इंग्रजी अक्षरे आहेत
पॅन कार्ड असे एक कार्ड (PAN Card) आहे, ज्यावर लिहिलेल्या नंबरच्यामाध्यातून त्या व्यक्तीची सर्व प्रकारची माहिती काढली जाऊ शकते. ही माहिती इनकम टॅक्स डिपार्टमेंटसाठी (Income tax department)आवश्यक असते, हे लक्षात घेऊन इनकम टॅक्स डिपार्टमेंट प्रत्येक व्यक्तीला पॅनकार्ड जारी करतो.
जाणून घेऊ या पॅनकार्ड वरील नंबरचा अर्थ काय असतोआहे.आपल्यासाठी पॅनकार्ड हे अति महत्वाचे आहे
१८ वर्षे पूर्ण झाली की भारतीय नागरिकाला पॅनकार्ड काढावेच लागते,
सरकारने दिलेल्या महत्त्वपूर्ण ओळखपत्रांमध्ये पॅनकार्ड हे अतिशय महत्त्वाचे आहे.
अनेक ठिकाणी पॅनकार्ड चा वापर करावा लागतो ज्यामध्ये बँकविषयक, आर्थिक, मालमत्ताविषयक वा शासकीय प्रक्रियांवेळी पॅनकार्डचा उपयोग होतो.
तर पॅनकार्डवर एक क्रमांक असतो, याक्रमांकाच्या मागे नक्कीच काहीतरी लॉजिक असणार,या क्रमांकाचा अर्थ काय आहे
पॅनकार्ड वरील या क्रमांकाला पॅन नंबर म्हणतात. हा पॅन नंबर १० आकडी असतो. हा क्रमांक पाच भागांमध्ये विभागून आपण याचा अर्थ पाहू या.
१) पॅन नंबरमध्ये पहिली तीन इंग्रजी मुळाक्षरे असतात. ही मुळाक्षरे AAA-ZZZ या सिरीजमधील असतात.
समजा एखाद्या पॅनकार्डला AAB ही तीन मुळाक्षरे दिली तर त्या नंतरच्या पॅनकार्डला AAC ही मुळाक्षरे दिली जातात.
आशा प्रकारे प्रत्येक पॅनकार्डवर AAA-ZZZ या सिरीजमधील मुळाक्षरे आढळून येतात.
२) चौथे मुळाक्षर हे पॅनकार्ड धारकाचे स्टेट्स दर्शवते. पॅन नंबर मधील हे इंग्रजी मुळाक्षर अतिशय महत्त्वाचे असते.कोणत्या मुळाक्षराचा अर्थ काय आहे ते पाहू या
P- सिंगल व्यक्ती
F- फर्म
C- कंपनी
A- AOP (एसोसिएशन ऑफ पर्सन)
T- ट्रस्ट
H- HUF (हिंन्दू एकत्रीत कुटूंब)
B- BOI (बॉडी ऑफ इंडिविजुअल)
L- लोकल
J- आर्टिफिशियल जुडिशियल पर्सन
G- गवर्नमेंट व्यक्ती
अश्याप्रकारे प्रत्येक मुळाक्षराचा एक अर्थ आहे. त्यानुसार ते मुळाक्षर त्या पॅनकार्डचे स्टेट्स दर्शवते.
३) पाचवं मुळाक्षर हे पॅनकार्ड धारकाच्या आडनावामधील पहिले मुळाक्षर असते.
म्हणजे जर तुमचं नाव संजय पाटील आहे तर पाचवं अक्षर हे P असेल.
४) त्यापुढील 4 क्रमांक हे 0001 ते 9999 या सिरीजमधील असतात.
समजा एखाद्या पॅनकार्डला 1245 हे क्रमांक दिले असतील तर त्या नंतरच्या पॅनकार्डला 1246 हे क्रमांक दिले जातात.
अश्याप्रकारे प्रत्येक पॅनकार्डवर 0001 ते 9999 या सिरीजमधील क्रमांक आढळून येतात.
५) शेवटचे इंग्रजी मुळाक्षर हे चेक डीजीट असते. जो पॅन नंबरचा फॉर्म्युला पूर्ण करतो.
असा आहे हे पॅनकार्डवरील कोड चा अर्थ