यवतमाळ जिल्ह्यातील पंचायत समिती अंतर्गत शिक्षक संवर्गाची मुळ सेवा पुस्तके अद्यावत नसल्याने वरिष्ठ कार्यालयाने नाराजी व्यक्त केली आहे. त्याअनुषंगाने आपण आपल्या पंचायत समिती स्तरावर सेवा पुस्तक अद्यावत करण्यासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करुन सेवा पुस्तक अद्यावत करण्यात यावी तसेच दुय्यम सेवा पुस्तके अद्यावत करण्यासाठी शिक्षकांना उपलब्ध करुन दयावे. सेवा पुस्तक सादर करतांना खालील प्रमाणे दक्षता घ्यावी,असे आशयाचे पत्र शिक्षणाधिकारी प्रा.यांनी सर्व पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांना पत्र काढून सूचित करण्यात आले आहे.
*महत्वाचे मुद्दे*
१. सेवा निवृत्त होणा-या कर्मचा-यांची सेवा पुस्तके प्रथम प्राधान्याने किंवा सेवा निवृत्तीच्या सहा महिने
अगोदर वेतन आयोगाच्या मंजुरी करीता सादर करावीत. २. चौथे, पाचवे, सहावे व सातवे वेतन आयोग मंजूरी तसेच एकरस्तर वेतनश्रेणी, आश्वासीत प्रगती
योजना, हिंदी- मराठी भाषा सुट शिक्षकांच्या सेवा पुस्तकामध्ये वेळोवेळी नोंदी घेवून अद्यावत करावे. तसेच दुय्यम सेवा पुस्तक आपल्या स्तरावरुन उपलब्ध करुन दयावे. प्रकरणी काही अडचणी आल्यास कॅम्पचे आयोजन करावे.
३. हिंदी/मराठी भाषा सुट, संगणकाची नोंद, सेवापडताळणी, जात वैद्यताबाबतची नोंद इत्यादी नोंदी घेण्यात याव्या.
४. सेवापुस्तकामध्ये नोंदी घेऊन लेखा शाखेकडून तपासुन कलेअ/सलेअ, गशिअ यांची स्वाक्षरी घ्यावी. ५. प्रकरणे वेळीच व अचुक सादर होत नसल्यामुळे कर्मचारी वारंवार कार्यालयात येऊन विचारणा करतात तसेच संघटने मार्फत निवेदन सादर करतात. त्यामुळे कामामध्ये व्यत्यय निर्माण होतो.