सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात स्टार्स प्रकल्पांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी एकूण २० विषयांवर Online / Blended कोर्स विकसित करण्यात आलेले आहेत. सन २०२३-२४ मध्ये स्टार्स प्रकल्पांतर्गत विभागाच्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक मधील मंजूर उपक्रमात सदर उपक्रमाचा समावेश आहे. स्टार्स प्रकल्पातील SIG ३ मधील ३.१ a तरतुदींची पूर्तता होणेसाठी राज्यातील २० जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या सहकार्याने सदर कोर्स विकसित करण्यात आलेले आहेत. सदरच्या सर्व कोर्सेसची अंतिम पडताळणी करण्यात आलेली आहे. सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी मराठी, इंग्रजी, गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांचे
ब्लेंडेड कोर्सेस पूर्ण करण्यासाठी दि.११.१०.२०२४ ते दि.३०.११.२०२४ हा कालावधी देण्यात आलेला होता. तथापि आपल्या जिल्ह्याची कोर्स नोंदणी संख्या कमी असल्याने शिक्षकांना सदर कोर्स पूर्ण करण्यासाठी दि.१०.१२.२०२४ पर्यंतची मुदतवाढ देण्यात येत आहे.
आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्राथमिक व माध्यमिक शिक्षक मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांच्या ब्लेंडेड कोर्सेसला नाव नोंदणी करून कोर्स पूर्ण करतील याची दक्षता घ्यावी. यानंतर मुदतवाढ मिळणार नाही याची नोंद घ्यावी.