राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे यांचा अभिनव उपक्रम
पायाभूत साक्षरता ही आजीवन शिक्षणाची एक आवश्यक पूर्वअट आहे पायाभूत साक्षरता प्राप्तीसाठी वाचन सवय ही एक महत्त्वाची बाब आहे.म्हणून जिज्ञासू ,कल्पक,उत्साही आणि सर्जनशील मुलांमध्ये वाचन सवयी विकसित होणे गरजेचे आहे.उपरोक्त विषयानुसार याच दृष्टिकोनातून भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयातर्फे राज्य सरकारच्या सहाय्याने बालवाटिका ते इयत्ता आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्याकरिता जानेवारी 2022 ते एप्रिल 2022 या कालावधीत 100 दिवसाकरीता वाचन अभियान 100 days reading campaign राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत 100 दिवसाकरीता आठवडानिहाय नियोजन देण्यात येत आहे. दिलेल्या नियोजनानुसार उपक्रमाची आठवडा निहाय अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. वाचन आनंददायी पद्धतीने होण्याकरिता सदर उपक्रमाची साध्या सहज व आनंददायी पद्धतीने रचना करण्यात आलेली आहे. या रचना चे संचलन सुकर होण्याकरिता आवश्यक संदर्भ साहित्य स्त्रोत हे शाळा,घर या स्तरावर सहज उपलब्ध होऊ शकेल अशा पद्धतीने देण्यात आलेले आहे. तसेच शाळा बंद असल्याचे स्थितीत करावयाच्या कृती ही देण्यात आले आहेत.आवश्यक बदला बाबतही यात सूचित करण्यात आलेले आहे. तसेच सदर अभियानाचा अनुषंगाने सहभागी घटकाच्या भूमिका व जबाबदारी या दृष्टीने मार्गदर्शक सुचना ही देण्यात येत आहेत.
1) 100 दिवसाकरीता वाचन अभियान या कार्यक्रमाचे दिनांक 1 जानेवारीपासून सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये अंमलबजावणी करण्यात यावी
2) सर्व पर्यवेक्षीय यंत्राने अभियानाच्या जनजागृती करीत आहे प्रयत्नशील रहावे
3) प्रत्येक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था द्वारे सदर कार्यक्रमाच्या गुणवत्तेचे सहा नियंत्रण करण्याकरिता गोष्टीचा शनिवारी या उपक्रमाचे समन्वयक यांनी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत
4)अभियानातील विविध उपक्रमांबाबत अहवाल तयार करण्यात यावा तसेच नोडल अधिकारी यांनी अभियानाचे योग्य व्हिडिओ तयार करून त्याचे क्षणचित्रे निवडून लिंकमध्ये अपलोड कराव्यात याबाबतची लिंग स्वतंत्ररीत्या कळविण्यात येणार आहे.
5)या वाचन अभियान अभियानाच्या सोशल मीडियावरील प्रसारासाठी पुढील हॅश टॅग वापरण्यात यावा. #100days Reading Campaign #padhe bharat
तरी दिनांक 1 जानेवारी 2020 पासून सोबत जोडलेल्या नियोजनानुसार व सूचनांनुसार आपल्या अधिनस्त सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये अभियानाची योग्य व यशस्वी अंमलबजावणी करण्यात बाबत सूचना देण्यात आल्या आहेत