वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण 2024-25 होणार ऑनलाईन पध्दतीने, ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यासाठी मागविल्या निविदा

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण 2024-25 होणार ऑनलाईन पध्दतीने, ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यासाठी मागविल्या निविदा

प्रशिक्षणार्थीना / शिक्षकांना माहिती नोंदणी करण्यासाठी विहित नमुन्यात पोर्टल विकसित करणे.

प्रशिक्षण शुल्क ऑनलाईन (payment gateway) जमा करून पावती देणे. व सर्व व्यवहारांचे विहित

नमुन्यात अहवाल देणे

नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थीना SMS किवा E- MAIL द्वारे CONFIRMATION देणे. याविषयीची विहित प्रक्रिया करणे,

प्रशिक्षणार्थीना नोंदणी क्रमांक विकसन (password मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून देणे.)

जिल्हास्तरावर प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्राचाय, प्रशिक्षण संस्था (DIET) यांना Login ID देणे, व सूचनेप्रमाणे माहिती उपलब्ध करून देणे तसेच प्रशासकीय पद्धती राबवणे उदा. हजेरीचा फोटो अपलोड करणे इ.

जिल्हास्तराव्र प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (36 DIET) यांना नोंदणी (शिक्षक माहिती, बॅच, गट, प्रशिक्षण प्रकार शुल्क परतावा इ.) मध्ये दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देणे.

निवडलेल्या प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षणादरम्यान आवश्यक मार्गदर्शक सूचना व जिल्हानिहाय जिल्हासमन्वयकांची नावे व संपर्क क्रमांक विहित नमुन्यात प्रसिद्ध करणे.

प्रशिक्षणाची Progress ची Day to Day माहिती उपलब्ध होणे. उदा. हजेरी, सुलभक । प्रशिक्षणार्थी online survey (feedback) इ. तज्ञ प्रशिक्षकांची मार्गदर्शकांची ऑनलाइन नोंदणी करणे. (दैनिक भत्ता मानधन, प्रवास भत्ता इ.)

१० प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर जिल्हा स्तरावर online पद्धतीने अटी शर्तीना अधीन राहून प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे. (उदा. एकही सेशन गैरहजर असेल प्रमाणपत्र तयार होऊ नये इ.)

उपरोक्त विषयानुसार संदर्भ क्र.२ अन्यये वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाची जबाबदारी राज्य शासनाकडून परिषदेस सोपविण्यात आली आहे. संदर्भ क्र.२ नुसार किमान १० दिवसांचे किंवा ५० घड्याळघ तासांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक करण्यात आले. यापूवी कॉविड १९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीमुळे सदर प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरुपात घेण्यात आले होते. वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पध्दतीने घेणेबाबत संदर्भ पत्र क्र.३ अन्वये महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारो (डायट) संघटना यांचेकडून तसेच संदर्भ पत्र क्र.४ ते ६ अन्वये वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पध्दतीने घेणेबाबत क्षेत्रिय कार्यालयांकडून विनंती करण्यात आली आहे.

प्रत्यक्ष वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण प्रभावीपणे दिले जाऊन, प्रशिक्षणांतर्गत तज्ञांचे मार्गदर्शन व प्रशिक्षणार्थीचे परस्परांमधील संभाषणात्मक शैलीतून अनुभव व विचारांची देवाण-घेवाण सहजगत्या व्हावी तसेच सदर प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा उपयोग शैक्षणिक सेवेत होऊन शिक्षक अधिक सक्षम व्हावा या उद्देशाने वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन सन २०२४-२५ पासून ऑफलाईन पध्दतीने पध्दतीने जिल्हास्तरावर (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमध्ये) घेण्याचे नियोजित आहे. यार्कारता सर्व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी ५ तज्ञ अभ्यासक / तज्ञ मार्गदर्शक यांची नावे परिषदेस दि.५ जून २०२४ पर्यंत preservicedept@maa.ac.in या ई-मेल आयडीवर सादर करावी. यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील वरिष्ठ अधिव्याख्याता/अधिव्याख्याता इत्यादी ३ तसेच याव्यतिरिक्त आपल्या जिल्ह्यातील इतर २ तज्ज्ञ मार्गदर्शकांचे नावांचा समावेश असावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *