तुमचा मोबाईल गरम होतोय का?काय आहेत कारणे जाणून घेऊ

हल्ली मोबाईल वापरनारांसाठी मोबाईल गरम होणे (over heating) ही खूप मोठी समस्या बनत चालली आहे.जरी आपण यावर खास लक्ष देत नसलो,तरी मोबाईल गरम होणे हे आपल्यासाठी धोक्याचे होऊ शकते.मोबाईल जास्त गरम होऊन मोबाईल फुटण्याची काही प्रकरणे आपल्या समोर आले आहेत. यासाठी आपण कोणती काळजी घ्यायला हवी व मोबाईल ओव्हर हिट होण्याची कारणे कोणती आहेत हे आपण आज जाणून घेऊ या

1.स्मार्टफोनमधील बॅटरी अतिरिक्त चार्जिंग करणं टाळा
2.मोबाईल 80 टक्के चार्ज असताना चार्ज करू नये
3.स्मार्टफोनची चार्जिंग 20 टक्क्यांच्या खाली येऊ देऊ नये.

4.मोबाईल स्विच ऑफ होईपर्यंत किंवा बॅटरी डेड होईपर्यंत मोबाईलचा वापर करणं टाळा
5.मोबाईलच्या कंपनीनं दिलेल्या चार्जरनेच चार्ज करा दुसऱ्या चार्जरने चार्ज करू नका.

6.मोबाईलला जास्त जाड कव्हर घालू नका त्यामुळे ओवरहिटिंगची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. 7.स्मार्टफोनचा फ्लॅश लाइट अधिक वेळ चालू ठेऊ नका.

  1. जास्त वेळ व्हिडिओ रिकॉर्डिंगमुळेही स्मार्टफोन गरम होत असतो.
    9.स्मार्टफोनला उन्हापासूनही दूर ठेवा. 10.स्मार्टफोनमध्ये सुरू असलेले Background Apps बंद करा.कामाचे आहेत तेवढेच App मोबाईल मध्ये ठेवा अनावश्यक App काढून टाका

या काही टिप्स आहेत याचा वापर जर आपण केला तर आपला मोबाईल ओव्हर हिट होण्यापासून वाचेल व आपल्या मोबाईलच्या बॅटरी चे लाईफ सुद्धा वाढेल.तर अशा प्रकारे स्मार्ट फोनचा स्मार्ट वापर करणे गरजेचे आहे.
सुरक्षित रहा,सतर्क रहा,स्वच्छता राखा,मास्कचा वापर करा,सामाजिक अंतर ठेवा,अपंग,गरजू वयस्कर लोकांना जमेल तशी मदत करा
धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *