मागर्दशक व्हिडिओ
शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदलीसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची कार्यवाही संदर्भ क्र. १ येथे नमूद पत्रातील वेळापत्रकानुसार सुरु असून बदली प्रणालीमध्ये टप्पा क्र. १,२,३, ४, ५ व ६ मधील कार्यवाही पुर्ण झालेली आहे. तथापि, अवघड क्षेत्रातील शाळांमधील रिक्त जागा भरण्याची कार्यवाही सुरु आहे.
विशेष संवर्ग-१ शिक्षकांची बदली ही विनंती बदली आहे. परंतु बदली प्रक्रिया राबविताना विशेष संवर्ग-१ मधील काही शिक्षकांनी अनावधानाने बदलीतून सूट मिळणेबाबतचा पर्याय न स्वीकारल्यामुळे असे शिक्षक अवघड क्षेत्रातील जागा भरण्याच्या टप्यात समाविष्ट झालेले आहेत. तसेच विशेष संवर्ग-१ मधील ज्या शिक्षकांची विद्यमान शाळेत ३ वर्षापेक्षा कमी झालेली आहे, अशा शिक्षकांना बदलीतून सूट मिळणेबाबतची संधी यापूर्वी देण्यात आलेली नाही. अशा विशेष संवर्ग १ मधील शिक्षकांना सरसकट अवघड क्षेत्रात बदली करणे उचित ठरणार नाही, अशी निवेदने विविध शिक्षक संघटनांकडून शासनास प्राप्त झालेली आहेत. त्यामुळे संदर्भ क्र. २ येथील शिफारशीस अनुसरुन शासन निर्णय दिनांक ०७.०४.२०२१ मधील १.८ नुसार विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ मधील ज्या शिक्षकांनी यापूर्वी अनावधानाने बदलीतून सूट मिळण्याचा पर्याय स्वीकारलेला नाही अशा संवर्ग-१ मधील शिक्षकांना बदलीसाठी होकार / नकार देण्याची शेवटची एकमेव संधी देण्यात देण्यात येत आहे. तसेच सर्वसाधारण क्षेत्रात १० वर्षे पूर्ण झालेल्या इतर सर्व शिक्षकांना अवघड क्षेत्रातील शाळांचा पसंतीक्रम भरण्याची संधी देण्यात येत आहे.
- यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांचे सेवा पुस्तक अद्यावत करणे-(शिक्षणाधिकारी प्रा.)
- शिक्षक दिनानिमित्त स्पेशल प्रश्नमंजुषा
- २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवा निवृत्त शिक्षक / डीएड, बीएड अर्हता धारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्ती बाबत
- शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद|शैक्षणिक व अशैक्षणिक कामे कोणती शासन निर्णय जारी
- प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) योजनेतंर्गत अंडी/केळीचा लाभ देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत…