महाराष्ट्र राज्य हे पर्यटनासाठी भारतातील एक महत्त्वाचे राज्य म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात हिल स्टेशन, कोकण किनारपट्टी, लेण्या, नैसर्गिक आणि धार्मिक पर्यटन स्थळे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील.पावसाळा आणि हिवाळा या दोन ऋतूंमध्ये संपूर्ण महाराष्ट्र निसर्ग संपन्न वातावरणाने भरून गेलेला असतोच परंतु उन्हाळ्यात देखील महाराष्ट्रामध्ये सहलीसाठी भेट देण्यासारखी अगदी उत्तम ठिकाणं आहेत महाराष्ट्राबरोबर संपूर्ण भारतातील पर्यटक आवर्जून मोठ्या संख्येने या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी येत असतात.
आज आपण महाराष्ट्रातील दहा उन्हाळी पर्यटन स्थळ बद्दल जाणून घेणार आहोत
१० पाचगणी
पाचगणी हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रमुख उन्हाळी पर्यटन स्थान पैकी एक आहे पाचगणी हे ठिकाण सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे सह्याद्री पर्वत रांगेत असलेल्या पाच डोंगरांनाच पाचगणी हे नाव देण्यात आलेले आहे पाचगणी हे एक उन्हाळी पर्यटन स्थळ आहे जे नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि छान वातावरणासाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. सप्टेंबर ते मे हा कालावधी या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी उत्तम समजला जातो.पुणे शहरापासून पाचगणी हे ठिकाण जवळपास 100 किलोमीटर एवढे अंतरावर आहे
९ माथेरान
माथेरान हे ठिकाण महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. महाराष्ट्रातील सर्वात लहान हिल स्टेशन म्हणून या माथेरान हिल स्टेशन कडे पाहिले जाते. माथेरान हे पर्यटन स्थळ उन्हाळ्यात भेट देण्यासाठी अगदी उत्तम ठिकाण आहे या ठिकाणी आपल्याला निसर्ग संपन्न वातावरणाबरोबर ट्रेकिंगचाही आनंद घेता येतो. माथेरानमध्ये सनसेट पॉईंट,इको पॉइंट, वन थ्री पॉईंट, द स्टोरी पॉईंट,प्रबळ किल्ला अशा अनेक ठिकाणांना भेट देता येईल. माथेरान हे ठिकाण पुणे शहरापासून १२० किलोमीटर तर मुंबईपासून 85 किलोमीटर एवढे अंतरावर आहे
८ अलिबाग
अलिबाग हे ठिकाण रायगड जिल्ह्यातील एक सुंदर आणि समृद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. रोजच्या तणाव मुक्त जीवनातून बाहेर येण्यासाठी आणि निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवण्यासाठी अलिबाग हे एक उत्तम ठिकाण आहे.अलिबाग मध्ये असणारे समुद्रकिनारे हे येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करतात अलिबाग मध्ये आपल्याला अलिबाग बीच, नागाव बीच, वर्सोली बीच, अशा अनेक ठिकाणांना भेट देता येईल.अलिबागला भेट देण्यासाठी ऑक्टोंबर ते मे हा कालावधी उत्तम समजला जातो पुणे शहरापासून अलिबाग हे ठिकाण 145 किलोमीटर तर मुंबईपासून 95 किलोमीटर एवढे अंतरावर आहे.
७ भंडारदरा
भंडारदरा हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रमुख उन्हाळी पर्यटन स्थळापैकी एक आहे. भंडारदरा हे महाराष्ट्राच्या अहमदनगर अकोले तालुक्यात आहे. पावसाळा संपल्यानंतर महाराष्ट्रातील बरेच पर्यटक आवर्जून या निसर्गरम्य ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात. भंडारदरा या ठिकाणी आपल्याला भंडारदरा धरण, क्षत्रिय धबधबा अशा अनेक सुंदर व मनमोहक ठिकाणांना भेट देता येईल. भंडारदरापासून जवळच असणारा रंधा धबधबा पाहण्यासाठी देखील बरेच पर्यटक गर्दी करत असतात. भंडारदरा हे ठिकाण पुणे शहरापासून 165 किलोमीटर तर मुंबईपासून 165 किलोमीटर एवढे अंतरावर आहे.
६ महाबळेश्वर
महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्र बरोबर भारतातील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. महाबळेश्वर हे एक थंड हवेचे ठिकाण आहे हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यामध्ये आहे. महाबळेश्वर हे ठिकाण निसर्गरम्य आणि नयनरम्य असून वर्षभर मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात. महाबळेश्वरचे शांत आणि मोहक वातावरण हे येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करत असते महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या या महाबळेश्वर या ठिकाणी आपल्याला एलिफंट हेड पॉईंट, वेंना तलाव,प्रतापगड,मेप्रो गार्डन अशी अनेक ठिकाण पाहायला मिळतील महाबळेश्वर हे ठिकाण पुणे शहरापासून १२० किलोमीटर तर मुंबईपासून 220 किलोमीटर एवढे अंतरावर आहे.
५ चिखलदरा
चिखलदरा हे ठिकाण महाराष्ट्रातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. चिखलदरा या ठिकाणी असणारे वातावरण हे कायम थंड आणि आरोग्यदायी असते.चिखलदरा हे ठिकाण महाराष्ट्राचे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे हे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेतील एक थंड हवेचे ठिकाण म्हणून संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी बरेच पर्यटक या ठिकाणी येत असतात. निसर्गाची आवड असणारे पर्यटक प्रामुख्याने या ठिकाणाला भेट देत असतात. चिखलदरा या ठिकाणी आपल्याला युको पॉईंट,देवी पॉईंट, नर्सरी गार्डन, भीमकुंड अशा अनेक ठिकाणांना भेट देता येईल चिखलदरा हे ठिकाण पुणे शहरापासून 608 किलोमीटर तर मुंबईपासून एक 622 किलोमीटर एवढे अंतरावर आहे.
4 लोणावळा
लोणावळा हे ठिकाण महाराष्ट्रातील एक चांगले पर्यटन स्थळ आहे. लोणावळा हे ठिकाण महाराष्ट्राच्या पुणे या जिल्ह्यामध्ये आहे मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांसाठी लोणावळा हे एक सर्वोत्तम पिकनिक स्पॉट म्हणून ओळखले जाते. लोणावळा या ठिकाणी असणाऱ्या निसर्ग संपन्न वातावरणामुळे बरेच पर्यटक या ठिकाणी आकर्षित होत असतात लोणावळा या ठिकाणी आपल्याला टायगर लीप,लोणावळा तलाव,अमृतांजन पॉईंट, भाज्या लेणी अशा अनेक ठिकाणांना भेट देता येईल ऑक्टोंबर ते मे हा कालावधील लोणावळा या ठिकाणाला भेट देण्यासाठी उत्तम समजला जातो. लोणावळा हे ठिकाण पुणे शहरापासून 65 किलोमीटर तर मुंबईपासून 83 किलोमीटर एवढे अंतरावर आहे.
3 काशीद बीच
काशीद बीच हा उन्हाळ्यात भेट देण्यासाठी सर्वात सुंदर आणि आकर्षक ठिकाणांपैकी एक आहे. काशीद बीच हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात आहे.पांढऱ्या वाळूचे किनारे, निळा समुद्र आणि घनदाट जंगलासाठी काशीद बीच हे ठिकाण प्रसिद्ध आहे. काशीद हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी गजबजलेला असला तरी या ठिकाणचे वातावरण हे शांत असते. हा बीच इतका सुंदर आहे की याची तुलना ही गोव्यातील बीचशी केली जाते उन्हाळ्याच्या सुट्टीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रातील बरेच पर्यटक आवर्जून या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात.
२ आंबोली
आंबोली हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रमुख उन्हाळी पर्यटन स्थान पैकी एक आहे. आंबोली हे पर्यटन स्थळ महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील एक सुंदर आणि रमणीय ठिकाण आहे. महाराष्ट्रातील सरासरी पावसाचे प्रमाण बघितले तर महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस हा आंबोली या ठिकाणीच पडतो साहजिकच या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो म्हणून या ठिकाणी असणारा परिसर हा घनदाट जंगल असल्याचे आपल्याला पाहायला मिळते आंबोली या ठिकाणी असणारे निसर्ग संपन्न वातावरण हे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना भुरळ पाडते. आंबोली हे महाराष्ट्रातील उत्कृष्ट आणि विकसित झालेले पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे वर्षभर पर्यटकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
1 मालवण
मालवण हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रमुख उन्हाळी पर्यटन स्थान पैकी एक आहे. मालवण हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तालुका आहे. उन्हाळ्याची सुट्टी घालवण्यासाठी मालवण हे महाराष्ट्रातील एक उत्तम ठिकाण आहे. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध मासेमारी बंदर म्हणून मालवणला ओळखले जाते. मालवण या ठिकाणी तारकर्ली बीच, मालवण बीच, नियुक्ती बीच, रॉक गार्डन,सिंधुदुर्ग किल्ला अशी अनेक ठिकाणी आहेत. ऑक्टोबर ते मे हा कालावधी मालवण या ठिकाणाला भेट देण्यासाठी उत्तम समजला जातो तर मित्रांनो ही होती महाराष्ट्रातील दहा उन्हाळी पर्यटन स्थळे या दहा पर्यटन व्यतिरिक्त ही महाराष्ट्रात उन्हाळ्यामध्ये भेट देण्यासारखी बरीच ठिकाण आहेत.
- STARS प्रकल्प अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गरजाधिष्ठीत प्रशिक्षणासाठी ब्लेंडेड मोड कोर्स लिंक्स
- अपार आयडी तयार करण्यासाठी विद्यार्थी नावात दुरुस्ती करण्याची सुविधा गटशिक्षणाधिकारी लॉगिन वर उपलब्ध अर्ज फॉरमॅट पीडीएफ डाउनलोड
- जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक
- शिष्यवृत्ती परीक्षा आवेदन पत्र भरणे सुरू
- राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२४-२५ चे आयोजन करणेबाबत….