विकलांग अपत्य असलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष बाल संगोपन रजा मंजूर करणेबाबत नवीन शासन निर्णय.

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मधील कलम २ (ZC) अंतर्गत, परिशिष्टात नमूद केल्यानुसार दिव्यांगत्वामध्ये खालील प्रवर्गांचा समावेश केला आहे. त्या प्रवर्गातील दिव्यांग अपत्य असणाऱ्या शासकीय महिला कर्मचान्यास तसेच अपत्य असून पत्नी नसलेल्या शासकीय पुरुष कर्मचान्यास देखील दिनांक २१ सप्टेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार विहित केलेली बाल संगोपन रजा अनुज्ञेय राहील :-

  1. Loco Motor Disability (अस्थिव्यंग)

२. Leprosy Cured Person (कुष्ठरोग निवारित/मुक्त) ३. Cerebral Palsy (मेंदूचा पक्षाघात)

४. Dwarfism (शारिरीक वाढ खुंटणे)

५. Muscular Dystrophy (स्नायुंची विकृती)

६. Acid Attack Victims (आम्ल हल्ला पिडीत)

७. Blindness (पूर्णत: अंध)

८. Low Vision ( अंशत: अंध)

९. Hearing Impaired (Deal and hard of Hearing) (कर्णबधिर / ऐकू कमी येणे)

१०. Speech and Language Disability (वाचा / भाषा दोष)

शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण-२०१६/प्र.क्र.५७/सेवा-६

११.intellectual Disability (बौद्धीक अक्षम)

१२. Specific Learning Disability (विशिष्ट अध्ययन अक्षम)

१३. Autism Spectrum Disorder (स्वमग्न)

१४. Mental Behaviour / Mental illness (मानसिक वर्तन / मानसिकआजार)

१५. Multiple Sclerosis (हातापायांतील स्नायू कमजोर / शिथिल होणे)

१६. Parkinsons disease (कंपवात) १७. Haemophilla (अधिक रक्तस्त्राव)

१८. Thalassemia (रक्ताची कमतरता)

१९. Sickle Cell Disease (रक्तात हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होणे)

२०. Chronic Neurological Condition (मज्जासंस्थेचे तीव्र आजार)

२१. Multiple Disabilities (बहुविकलांग)

उपरोक्त नमूद दिव्यांगत्व हे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मधील दिव्यांगत्वाच्या व्याख्येप्रमाणे असणे अनिवार्य राहील.

२. सदर रजा अनुज्ञेयतेच्या अटी दिनांक २१ सप्टेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार विहित केलेल्या आहेत. या अटींपैकी अनुक्रमांक (ii) येथे नमूद केलेली, सदर रजा विकलांग अपत्याच्या वयाच्या २२ वर्षापर्यंत घेता येईल, ही अट वगळण्यात येत आहे. तसेच सदर रजा एका वेळेस पाच दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी घेता येणार नाही, या अटीचा नव्याने समावेश करण्यात येत आहे.

३. हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.

४.सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मध्ये आवश्य त्या सुधारणा यथावकाश करण्यात येतील..

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२३०३०९१४२१५०३५०५ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

ANITA GOPAL LAD

प्रति,

(अनिता लाड)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

१) मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा / विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई. २) सर्व सन्माननीय विधानसभा / विधानपरिषद व संसद सदस्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *