केंद्रप्रमुख पदाची परीक्षा डिसेंम्बरच्या शेवटच्या आठवड्यात होणार

विषय:- ‘केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३’ या परीक्षेचे आयोजनाबाबत.

संदर्भ:- १. शासन पत्र क्र. संकिर्ण २०२२/प्र.क्र. ८१/टीएनटी१. दि. १५/०९/२०२२.

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये “केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३’ या परीक्षेचे आयोजन करणेबाबत संदर्भीय पत्रान्वये शासनस्तरावरून मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार “केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा – २०२३’ या परीक्षेचे आयोजन माहे जून २०२३ च्या शेवटच्या आठवडयामध्ये करण्यात येणार होते. परंतु काही प्रशासकिय कारणास्त सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. तरी सदर परीक्षेचे माहे डिसेंबर २०२३ च्या शेवटच्या आठवडयात ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे.

सदर परीक्षा आयोजन सुरळीतपणे पार पडण्याची जबाबदारी परीक्षा केंद्र निरीक्षक (Observer) यांची राहील, प्रत्येक परीक्षा केंद्रावर निरीक्षक (Observer) नियुक्त करावयाचे असल्याने आपल्या कार्यालयातील कार्यरत असलेले वर्ग १ व वर्ग – २ चे अधिकारी यांची माहिती या कार्यालयास खालील विहित नमुन्यात तात्काळ पाठविण्यात यावी. सदर अधिका-यांना उपरोक्त नमुद प्रमाणे परीक्षा कालावधीत अन्य कोणतीही जबाबदारी देण्यात येऊ नये, तसेच अधिकाऱ्याचे लगतचे नातेवाईक परीक्षेस प्रविष्ठ नाहीत अशाच अधिका-यांचे प्रत्येक जिल्हा निहाय किमान ४ (चार) नावे कळविण्यात यावी.

तरी “केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३’ या परीक्षेचे आयोजन माहे डिसेंबर २०२३ च्या शेवटच्या आठवडयात ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे.

पत्र वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *