५ वी व ८वी साठी वार्षिक परीक्षा प्रश्नपत्रिका व कार्यपद्धती निश्चित करणेबाबत

संदर्भ:-

संदर्भ :-१. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९

२. शासन निर्णय क्र. पीआरई/२०१०/११३६) १०/प्राशि-५, दि. २० ऑगस्ट २०१०

३ महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०११ दि २०११ ऑक्टोबर ११.

४. शासन निर्णय क्र.६. डी.एस/१७/११८/२०१७/ संकीर्ण दि १६ ऑक्टोबर २०१८

५. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम) सुधारणा, २०१९

दि. ११ जानेवारी २०१९

६. महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०२३ (सुधारणा)

दि २०२३मे २९.

७. शासन निर्णय क्र/२७६ प्रक्र / २०२२-आरटी ई. एस दि १.डी.०७ डिसेंबर २०२३

८. या कार्यालयाचे पत्र क्र. जा.क्र. राशैसंप्रपम/मूल्यमापन पाचवी आठवी / परीक्षासचूना-२०२३/

२४/०६२९७ दि. २८ डिसेंबर २०२३

९. या कार्यालयाचे पत्र क्र. जा.क्र.रा.डी.सं.प्र.प.म./वि. वाटप/आस्था- १/२/२०२३/०८९७

दि. २०.०२.२०२४

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये, महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हक्क नियम २०२३ (सुधारणा) अधिसूचनेनुसार इयत्ता ५ वी व ८ वी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन पद्धती २०२३-२४ पासून लागू करणेबाबत संदर्भ क्र. ७ नुसार निश्चित करणेत आलेली आहे.

सदर शासन निर्णयानुसार अंमलबजावणी संदर्भात नियोजन करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने संदर्भ क्र. ७ मध्ये नमूद केल्यानुसार राज्य नियंत्रण समिती गठीत करणेत आलेली आहे.

संदर्भ क्रमांक ८ अन्वये आपणास सनियंत्रण समितीच्या बैठकीचे इतिवृत्त मधील सूचना व संदर्भ क्र ७ च्या शासन निर्णयानुसार कार्यवाहीची अंमलबजावणी करणेबाबत कळविण्यात आले होते.

संदर्भ क्रमांक ८ अन्वये शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शाळांना इयत्ता ५ वी व ८ वीच्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका राज्यस्तरावरून पुरविण्यात येतील असेही कळविण्यात आले होते.

तथापि संदर्भ क्र. ७ व १ अन्पये शासन निर्णयानुसार सदर प्रश्नपत्रिका ह्या शाळास्तरावर तयार करणेत याव्यात असे नमूद केलेले असल्याने इयत्ता ५ वी व ८ वीच्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शाळास्तरावर तयार करणेबाबत आपल्या अधिनस्त सर्व शाळांना अवगत करावे. असे संचालक,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी सूचित केले आहे.

Classroom, School Building, Writing, Working, India,

इयत्ता ५ वी व ८ वी च्या विद्यार्थ्यांचा अधिकचा सराव होणेकरिता परिषदेच्या वेबसाईटवर नमुना सराव प्रश्नपत्रिका व संविधान तक्ते अपलोड केलेले आहेत.

वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या प्रश्नपत्रिकांचा आधार घेऊन सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी त्यांचे स्तरावर प्रश्नपत्रिका तयार करणे तसेच संदर्भ क्र. ७ अन्वये शासन निर्णयानुसार इयत्ता ५ वी व ८ वी च्या वार्षिक परीक्षेबाबत कार्यवाही करणेबाबत सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना अवगत करावे.

पत्र वाचा

शासन निर्णय संकेतस्थळ

https://gr.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *