जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्गाच्या सन २०२२ मधील जिल्हांतर्गत बदल्यांबाबत ग्रामविकास विभागाचे आजचे पत्र

महाराष्ट्र शासन

ग्रामविकास विभाग

बांधकाम भवन, २५, मर्झबान

रोड, फोर्ट, मुंबई – ४०० ००१

प्रति,

क्र. जिपब-२०२२/प्र.क्र. २९/आस्था-१४ दिनांक :- १५ नोव्हेंबर, २०२२.

विषय : जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्गाच्या सन २०२२ मधील जिल्हांतर्गत बदल्यांबाबत……

संदर्भ : १) शासन निर्णय क्र. जिप ४८२०/प्र.क्र.२९०/आस्था- १४, दि.०७.०४, २०२१.

२) शासनाचे समक्रमांकाचे दि. २१/१०/२०२२ रोजीचे पत्र.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी संदर्भीय दि.०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतूदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत (बदलीस पात्र असलेल्या / विशेष संवर्ग भाग-१ मधील / विशेष संवर्ग भाग- २ मधील शिक्षकांची यादी, निव्वळ रिक्त पदांची यादी. संभाव्य रिक्त पदांची यादी, जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे, इत्यादी वेळोवेळी आपणास शासन स्तरावरून निर्देश देण्यात आलेले आहेत.

२. संदर्भीय दि. २१/१०/२०२२ च्या पत्रान्वये जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून त्यानुसार बदल्यांची कार्यवाही सुरु आहे. तथापि, काही जिल्हा परिषदांमध्ये एकच UDISE क्रमांक असलेल्या काही शाळा विविध माध्यमांच्या असून अशा शाळांतील शिक्षकांचा / रिक्त पदांचा तपशील भरण्यास अडचण येत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे अशा शाळांतील शिक्षकांची / रिक्त पदांची माहिती माध्यमनिहाय भरण्याबाबतची सुविधा ऑनलाईन शिक्षक बदली प्रणालीमध्ये उपलब्ध करुन देण्यात येत असून अशा शाळांतील शिक्षकांची / रिक्त पदांची माहिती ऑनलाईन शिक्षक बदली प्रणालीमध्ये माध्यमनिहाय अद्ययावत करावी, जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी आगोदरच विलंब झालेला असल्याचे अशा प्रकरणी कार्यवाही करण्यास विलंब कटाक्षाने टाळावा.

प्रत आवश्यक त्या कार्यवाहीसाठी

(उर्मिला जोशी) अवर सचिव, महाराष्ट्र शासन

१) उप आयुक्त (आस्थापना), विभागीय आयुक्त कार्यालये (सर्व) २) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद (सर्व)

३) Vinsys IT Services (I) Pvt. Ltd, Shivaji Niketan, Tejas Society, Kotharud, Pune. यांना कळविण्यात येते की, एकच UDISE क्रमांक असलेल्या बहु माध्यमाच्या शाळांचा (Multiple Medium School) तपशील (शिक्षक, रिक्त पदे, इत्यादी) माध्यमनिहाय अद्ययावत करण्यासाठी शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रणालीमध्ये आवश्यक त्या सुधारणा त्वरीत कराव्यात. ४) निवडनस्ती, आस्था- १४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *