तलाठी भरतीबद्दल मोठी बातमी. इतक्या” पदांसाठी होणार नवीन भरती
Talathi Bharti : राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी व आनंदाची बातमी आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून तलाठ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने महसूल यंत्रणेवर ताण येत आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने तलाठी भरती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बातमीमुळे तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासन निर्णय पाहण्यासाठी सर्वात खाली लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही पूर्ण माहिती पाहू शकता.
राज्यात लवकरच 3165 जागांसाठी तलाठी भरती घेणार आहेत. या तलाठी भरतीसाठी मंजुरी दिली असून, पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भरती टप्प्याने घेतली जाणार आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात तलाठ्यांच्या जागा रिक्त आहेत. यामुळे सध्याच्या महसूल यंत्रणेनवर म्हणजेच कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने तलाठी भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्यात 3165 जागांसाठी भरतीसाठी मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात एक हजार तलाठ्यांची भरती होणार आहे.
तलाठी यांची कामे
तलाठी विविध प्रकारची कामे करत असतो. एका तलाठ्याकडे अनेक गावे दिली जातात. यामुळे तलाठ्यांची कामे वाढलेली आहेत. तलाठ्यांना अशी अनेक कामे आहे, जी अनेकांना माहीत नसेल. तर चला जाणून घेऊया कोणकोणती कामे तलाठीला करावी लागतात.
भरपूर ठिकाणी 3 ते 4 गावांसाठी एकच तलाठी असल्या कारणाने, या सर्व कामांचा ताण / तलाठ्यांवर येतो. या जास्त कामांच्या तणावामुळे सरकारच्या विविध योजनांपासून नागरिकही वंचित राहतात. कारण तलाठ्यांकडे जास्त कामे झाल्यामुळे या गोष्टींकडे जास्त दिल्या जात नाही.