Budget 2023 New Income Tax: एका व्यक्तीचे उत्पन्न 9 लाख रुपये, मग नेमका टॅक्स किती?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला.मोदी सरकार (Modi Government) 2.0 मधील हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. पुढच्या वर्षी निर्मला सीतारमण अंतरिम अर्थसंकल्प (सार्वत्रिक निवडणुका पूर्ण होईपर्यंतचा अर्थसंकल्प) सादर करतील. सीतारमण यांनी नवी कररचना जाहीर करताना नोकरदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. 7 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त असेल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. मात्र, केवळ 7 लाखांच्या आत उत्पन्न असेल तरच उत्पन्न टॅक्स फ्री असेल, त्यापुढे जर 1 रुपयाही वाढला, तर स्लॅबनुसार कर द्यावा लागेल, तो 3 लाखांपासून सुरू होईल.

नवी कररचना कशी आहे?

करप्राप्त उत्पन्नटॅक्स स्लॅब (टक्क्यांमध्ये)
0 ते 03 लाख0 टक्के
3 ते 6 लाख5 टक्के
6 ते 9 लाख10 टक्के
9 ते 12 लाख15 टक्के
12 ते 15 लाख20 टक्के
15 लाखांहून जास्त30 टक्के

नवी कररचना सादर करताना 7 लाखापर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री मग 3 ते 6 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के टॅक्स कसा हा प्रश्न काहींना पडून शकतो. मात्र त्याबाबतचं गणित आपण उदाहरणासह पाहू…

उदाहरणार्थ :

समजा, एका व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न 9 लाख रुपये आहे, तर त्याला किती रुपये टॅक्स भरावा लागेल?

टॅक्सचं गणित नेमकं कसं असेल?

समजा, तुमचं उत्पन्न 7 लाख आहे तर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही

मात्र जर तुमचं उत्पन्न 7 लाख 1रुपया ते 9 लाख रुपये असेल तर तुम्हाला 45 हजार रुपये कर भरावा लागेल.

तो कसा – पहिल्या 3 लाखांवर टॅक्स नसेल त्यानंतरच्या 3 लाखांवर – 5 टक्के म्हणजे 15 हजार रुपये.

त्यानंतर पुढच्या टॅक्स स्लॅबमध्ये म्हणजे 6 ते 9 लाखापर्यंतच्या 3 लाखांवर स्लॅबनुसार 10 टक्के म्हणजे 30 हजार रुपये असे 45 हजार रुपये टॅक्स असेल जर तुमचं उत्पन्न 9 लाख रुपये असेल तर.

9 लाख ते 12 लाखापर्यंत 15 टक्के दराने 45 हजार रुपये कर – म्हणजे जर तुमचं उत्पन्न 12 लाख असेल तर तुम्हाला 9 लाखापर्यंतचे 45 हजार आणि पुढच्या ३ लाखांवर 15 टक्के दराने 45 हजार असे 90 हजार रुपये कर द्यावा लागेल.

15 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर 1.50 लाख कर द्यावा लागेल – तो कसा? तर 12 लाखाच्या पुढे 3 लाखांवर 20 टक्के दराने कर आकारला जाईल तो 60 हजार आणि आधीच्या 12 लाखापर्यंतचे 90 हजार असे एकून दीड लाख रुपये टॅक्स द्यावा लागेल.

त्यानंतर 15 लाखाच्या पुढे उत्पन्न असणाऱ्यांना 30 टक्के दराने कर द्यावा लागेल. .

जर 20 लाख उत्पन्न असेल तर वरचे सगळे स्लॅब अधिक 30 टक्के यानुसार 3 लाख रुपये टॅक्स द्यावा लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *