सध्याच्या काळात आपण सर्रास ऑनलाईन पैसे पाठवत असतो,हे काम तितकेच सोपे व गरजेचे होऊन बसले आहे.शासन सुद्धा डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देत आहे.परंतु ऑनलाईन पैसे पाठवताना आपणास काही गोष्टीची काळजी घेणे गरजेचे आहे आपण जर ही काळजी नाही घेतली तर आपले खाते रिकामे होण्याची व मोठी आर्थिक हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी कोणत्या गोष्टी आपण कराव्यात
बँक खाते नं व्यवस्थित तपासा
आपणास ज्या खाते नं वर पैसे पाठवायचे आहेत तो खाते नं पैसे पातगवण्यापूर्वी एक दोन वेळेस तपासून पहा आणि नंतरच पैसे ट्रान्सफर करा यासाठी आपण पहिल्यांदा 1 रु.पाठवून सुद्धा तपासू शकता असे केल्याने झाले तरी आपले 1₹ नुकसान होईल
IFSC कोड तपासा
ऑनलाईन पैसे पाठवताना आपणास समोरच्या व्यक्तीच्या खातेचा IFSC कोड असणे आवश्यक असते हा कोड आपण पासबुक, चेक यावरून किंवा प्रत्यक्ष बँकेतून मिळवू शकता.किंवा आपण ऑनलाईन सर्च करून सुद्धा संबंधित बँकेचा IFSCE कोड मिळवू शकता
अधिकृत app चा वापर करा
आजकाल आपण ऑनलाईन पैसे पाठवण्यासाठी वेगवेगळ्या app चा वापर करत असतो परंतु असे न करता बँकेचे अधिकृत app च वापरावे
समोरच्या व्यक्तीकडे तेच अँप आहे का?खात्री करा
आपण नेहमीच फोन पे गुगल पे अशा app च्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करत असतो तेव्हा खात्री करा की ज्यांना पैसे पाठवायचे आहेत त्यांच्याकडे सदरचे अँप आहे का कारण अँप नसेल तर त्यांना पैसे जाणार नाहीत व तुमच्या खात्यातून पैसे डिडक्ट होतील अशावेळी मग आपणास नाहक त्रास सहन करावा लागतो.
मोबाईल नं तपासा
सध्याला मोबाईल नं वर सुद्धा पैसे पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे तेव्हा मोबाईल नं द्वारे पैसे पाठवताना तो दोन तीन वेळा तपासून पहावा अन्यथा नं चुकला तर चुकीच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात