पवित्र (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येणाऱ्या शिक्षक पद् भरतीच्या अनुषंगाने विद्यमान तरतूदी सुधारित करणे/ वगळणे व नवीन तरतूदी समाविष्ट करणे.

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील, रात्र शाळांमधील तसेच, शासकीय व अनुदानित अध्यापक विद्यालयातील (डी.एल.एड कॉलेज) शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकाची भरती “अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी” यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र (PAVITRA- Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यासाठी संदर्भ क्र. ३ येथील शासन निर्णयान्वये पारदर्शक पध्दती विहीत करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात पवित्र या प्रणालीद्वारे भरती प्रक्रिया राबविताना सदर कार्यपध्दतीमध्ये बदल / सुधारणा करणे व काही तरतूदी नव्याने समाविष्ट करण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. यासाठी विविध स्तरावर घेण्यात आलेल्या बैठका व आयुक्त. शिक्षण यांच्या दिनांक १२.१०,२०२२ रोजी प्राप्त प्रस्तावाच्या आधारे शासन निर्णय क्र. सीईटी-२०१५/ प्र.क्र. १४९ / टिएनटि-१, दि.०७.०२.२०१९ यामधील काही तरतूदी वगळणे/सुधारणा करणेबाबतचा निर्णय घेण्याची व नव्याने तरतूदी समाविष्ट करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

शासन निर्णय क्रमांक संकीर्ण- २०२२/प्र.क्र.१०६ / टिएनटि १

शासन निर्णय

शासन परिपत्रक क्र. एसएससी- १३९८/२२३०२८/१०९७/ उमाशि-१, दि.२२/०६/२००० व शासन निर्णय क्र एचएससी १३०५ (६३/०५/ ) / उमाशि-१, दिनांक-१/१२/२००५ यान्वये अधिक्रमित करण्यात येत आहेत.

०२. उक्त वाचा येथील क्र ३ येथील शासन निर्णय दिनांक ०७.०२.२०१९ मधील पुढील तरतूदी

सुधारित करण्यास व वगळण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

१. शासन निर्णय क्रमांक : सीईटी२०१५/प्र.क्र. १४९/ टीएनटी-१, दि.०७.०२.२०१९ मधील परिच्छेद क्र.३.४ येथील “एका उमेदवारास गुण सुधारण्यासाठी जास्तीत जास्त पाच वेळा परीक्षेची संधी उपलब्ध राहील,” या तरतूदी ऐवजी “उमेदवारास प्रत्येक वेळी नव्याने होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होणे अनिवार्य राहील. उमेदवाराचे त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिध्द झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत” असे समाविष्ट करण्यात येत आहे.

२. शासन निर्णय क्रमांक : सीईटी२०१५/प्र.क्र. १४९/ टीएनटी-१, दि. ०७.०२.२०१९

मधील परिच्छेद क्र. ३.६ येथील तरतूद यान्वये वगळण्यात येत आहे. परंतु उर्वरित तरतूदी यापुढेही लागू राहतील.

०३. पवित्र पोर्टलमार्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे तरतूदी समाविष्ट करण्यात येत आहेत:

०१. शिक्षक पदभरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात येईल. तथापि, सन २०२२ मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवारांचे वय कोविड- १९ च्या पार्श्वभूमीवर २ वर्षासाठी शिथिलक्षम करण्यात येत आहे. ०२. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास

किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल. ०३. शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणीकरीता उमेदवाराने निवडलेले माध्यम हे केवळ चाचणी परीक्षेपुरते मर्यादित राहील. या चाचणीच्या माध्यमाचा निवड प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.

०४. शिक्षक अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणीनंतर पदभरतीसाठी आवश्यकतेनुसार

तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहीराती घेण्यात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *