मराठी टाईप करा अगदी सोप्या पद्धतीने मोबाईल व कॉम्प्युटर वर

आपल्याला मोबाईल वर मराठी टायपिंग करता येत नाही. त्यामुळे बहुतेक जण इंग्रजीमध्येच लिहून आपल्या मित्र मैत्रिणीशी, नातेवाईकांशी चॅटिंग करत असतात.

तसेच कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वर सुद्धा मराठीमध्ये पत्र टाइप करायचे असेल, तर मोठी समस्या निर्माण होते. तर आज आपण याविषयी या लेखामधून माहिती घेणार आहोत,की मोबाईल वर तसेच कम्प्युटर लॅपटॉपवर सोप्या पद्धतीने आपण मराठी टायपिंग कसे करू शकतो.
अगोदर आपण संगणक(Computer)लॅपटॉप(laptop) मध्ये मराठी टायपिंग कशी करावी याविषयी माहिती पाहू या.
1.मायक्रोसॉफ्ट मराठी इनपुट टूल्स:-मायक्रोसॉफ्टचे इंडिक लँग्वेज इनपुट टूल वापरून आपण अगदी सोप्या पद्धतीने मराठी टायपिंग करू शकतो. म्हणजे टाइप करतेवेळी आपण इंग्रजीमधूनच टाइप करायचे व हे टूल्स त्याला मराठीत टाइप करेन

https://www.microsoft.com/en-in/bhashaindia/downloads.aspx

या लिंक वर जाऊन आपण मराठी टूल्स (SDK व्हर्जन डाउनलोड करून घ्या) इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या कॉम्प्युटर च्या खालच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात ENG या चिन्हावर क्लिक करून किंवा कीबोर्ड वरील विंडोज चे बटन व स्पेस चे बटन दाबून ही आपणास मराठी किंवा इंग्रजी टाइप करता येईल.

मोबाईल मध्ये मराठी टाइप करण्यासाठी बरेच APP आहेत.परंतु सगळ्यात सोपे ,प्रभावी व जास्त वापरले जाणारे गुगल इंडिक कीबोर्ड हे APP आहे.playstore वरून हे app इन्स्टॉल करून घ्या. त्यानंतर मोबाईलच्या सेटिंग मध्ये जाऊन language and input मध्ये google indic keyboard निवडा त्यानंतर तुम्ही मोबाईल मध्ये कुठेही टायपिंग करत असताना या कीबोर्ड च्या मदतीने सोप्या पद्धतीने मराठी टाइप करता येईल.
याला कुठेही इन्टरनेट लागत नाही एकदा डाउनलोड केले की मग ते ऑफलाइन चालते आणि हे युनिक कोड असल्याने कुठेही हे फॉन्ट ओपन होतात अशाप्रकारे आपण मोबाईलवर कुठेही व लॅपटॉप/कॉम्प्युटर वर वर्ड ,एक्सेल,power point, व इतर सर्व सॉफ्टवेअर मध्ये आपण सहज मराठी टायपिंग करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *