फसव्या वेबसाईट (Fake website) पासून सावधान? काय होतील धोखे?

सध्याचा काळ हा तंत्रज्ञानाचा काळ आहे.प्रत्येक गोष्ट ही तंत्रज्ञानावर आधारित झालेली आहे.जसा त्याचा वापर वाढला आहे तसे आपले धोखे पण वाढले आहेत. आपणास काहीही शोधायचे असेल,काहीही माहिती हवी असलेत तर आपण सहज म्हणतो गुगल कर ना,पण हे करत असताना आपण याचीही काळजी घ्यायला हवी की आपण सर्च करत असलेल्या वेबसाईट या फेक तर नाहीत ना,कारण अशा फेक वेबसाईटमुळे आपणास मोठ्या प्रमाणात धोका होऊ शकतो.कारण अशा फसव्या वेबसाईट च्या मदतीने हॅकर्स युजर्सच्या स्मार्टफोनमधील डेटा आणि प्रायव्हेट माहिती गोळा करण्याची शक्यता असते. एवढंच नाही तर त्यामुळे स्मार्टफोनमध्ये व्हायरस आणि मालवेयर येण्याचा धोकादेखील असतो. त्यामुळे आपण याबद्दल खूप काळजी घेणे आवश्यक आहे.

स्मार्टफोनवर वेबसाईट्स ओपन करत असाल तर त्या फसव्या आहेत की नाही, हे ओळखणे व त्याबद्दल काळजी घेणे या काही बाबी लक्षात ठेवल्यास तुमचा फोन हॅकर्सपासून, धोकादायक मालवेअरपासून दूर ठेवता येतो.

फेक वेबसाईट्स कशा ओळखाव्यात-

वेबसाईट ओपन केल्याबरोबर सुरुवातीला https आहे की नाही ते चेक करा. त्यात जर https:// असेल तर ती वेबसाईट सेफ असते. जर ते नसेल तर वेबसाईट फेक असण्याची शक्यता असते.त्यामुळे https:// असलेल्या वेबसाईट्सलाच भेट द्यायला हवी.

पॉप-अप – वेबसाईट ओपन करताना त्यातला पॉप-अप चेक करायला हवा. पॉप-अपद्वारे युजर्सला दुसऱ्या वेबसाईटवर नेलं जातं.हॅकर्स हे आपल्या स्मार्टफोनमध्ये पॉप-अपच्या माध्यमातून हॅकिंग करत असतात. आणि आपल्या मोबाईल मधील डेटा चोरी केला जातो .

Permission Request -काही वेबसाईट किंवा App पणओपन केल्यानंतर आपणास Permission Request मागितल्या जातात. त्या Permissions आपण लक्षदेवून वाचायला हव्या. कारण त्याद्वारे काही फसव्या लिंक्स हॅकर्स युजर्सच्या मोबाईल मध्ये टाकतात आणि त्याद्वारे हेरगिरी करतात.

वेबसाईटचे URL चेक करा – कोणत्याही वेबसाईट वापरताना त्या हा URL चेक करा शक्यतो शॉपिंग वेबसाईट्स , बँकिंग वेबसाईट्स अशा वेबसाईट वापरताना विशेष काळजी घ्या. कारण अशा ठिकाणी आपली फसवणूक होण्याची जास्त शक्यता असते येथेच स्मार्टफोन फिशिंग जास्त प्रमाणात होत असतात.वेबसाईट च्या अड्रेस मधील स्पेलिंग नीट चेक करा यामध्ये थोडा फार बदल तरुण ओरिजनल वेबसाईट सारख्या फसव्या वेबसाईट बनवलेल्या असतात.

वेबसाईट वरील साहित्य पहा-वेबसाईटवर प्रसारित केलेले साहित्य एक तर तूटपुंज असत किंवा चुकीचं असत.यामध्ये लिहिण्यात आलेल्या टेक्स्ट मध्ये स्पेलिंग मध्ये चुका असतात.अशी वेबसाईट फसवी आहे हे समजून घ्यावे.

Virus Total वेबसाईट चा वापर करा-Virus Total ही एक प्रसिद्ध वेबसाईट आहे. ज्यामध्ये आपणास URL चेक करता येतो. व येथे खऱ्या वेबसाईट व फसव्या वेबसाईट चीही माहिती मिळत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *