आज काल बँकेतून पैसे जाण्याचे फ्रॉड प्रकरणे खूप समोर येत आहेत व याला प्रसिद्ध व्यक्ती सुद्धा अपवाद नाहीत. बरेच सेलिब्रिटी बाबत सुद्धा आशा घटना घडलेल्या समोर आल्या आहेत.सामान्य माणसापासून ते सेलिब्रिटी पर्यन्त बरेच जन यामध्ये बळी पडले आहेत.या अशा सर्व प्रकरणातून एक बाब स्पष्ट होते ती म्हणजे आपल्या नकळत पैसे काढले जाऊ शकतात, त्यावर उपाय काय, असे प्रश्न पडणे साहजिक आहे. जाणून घेऊया… चोर कसे काढून घेतात तुमच्या बँक खात्यातून पैसे… यावर उपाय काय आहेत…
चोर नेमके काय करतात…असे चोर आपणास बँक अधिकारी म्हणून फोन करतात.आणि सांगतात तुमचे KYC बाकी आहे किंवा इतर काहीतरी करणे आवश्यक आहे नः केले तर तुमचे खाते बंद होईल वैगरे व त्यानंतर लिंक तुम्हाला लिंक पाठवतात. आणि आपण आशा फसव्या लिंकवर क्लिक केल्यानंतर काही वेळाने आपल्या खात्यातून पैसे वजा होतात.आणि आपल्या खात्यातून पैसे काढण्याचा संदेश आपल्या मोबाइलवर मिळतो.
हे होते कसे ?तुम्हाला एसएमएस किंवा ई-मेलद्वारे एक लिंक पाठवली जाते.त्या लिंकवर क्लिक करून पुढील प्रक्रिया पार पाडा, असे सांगितले जाते.अशा लिंक्सद्वारे तुमच्या मोबाइलचा ॲक्सेस मिळवला जातो. स्क्रिन शेअरिंग करून.त्यातून तुमच्या फोनमधील सर्व माहिती ऑनलाइन चोरांच्या हाती लागते आणि बँकेतून सहज पैसे काढले जातात.
कोणती काळजी घ्यावी?सर्वात महत्वाची बाब कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये.तसेच अनोळखी किंवा फसवे वाटणारे एसएमएस किंवा मेल आले तर ते ओपन न करता लगेचच डिलीट करावेत.ज्या वेबसाईटवर आपणास आर्थिक व्यवहारांसाठी लागणारे पासवर्ड , बँक डिटेल्स टाकायचे असतील तेव्हा त्या वेबसाईटची सत्यता काळजीपूर्वक तपासावी. संशय आल्यास व्यवहार करू नये.
कोणत्याही फसव्या आमिषाला बळी पडू नये जसे कि आपणास सांगितले जाते की आपणास लॉटरी लागली आहे.
बँकेसंदर्भातील आपले पासवर्ड किंवा इतर बाबी कोणालाही शेयर करू नये.
ऑनलाईन पेमेंट साठी वापरण्यात येणारे APP किंवा इतर बाबी विषयी खात्री करून घ्यावी.
फ्रॉड झाल्यावर काय करावे?
फोर्ड झाला आहे असे लक्षात आल्यावर प्रथम आपण आपले खाते ब्लॉक करावे यासाठी आपण आपल्या बँकेच्या होम ब्रँच ला जाऊन करू शकता किंवा बँकेच्या वेबसाईटवर जाऊन लॉगिन करूनही करू शकता.तसेच आपण आपले ATM CARD, DEBIT CART किंवा क्रेडिट कार्ड सुद्धा तात्पुरते बंद करावे.
फ्रॉड जर UPI च्या माध्यमातून झाला असेल तर UPI अकाउंट बंद करावेत व त्यानंतर सेम मोबाईल नं वर UPI अकाउंट चालू न करता दुसऱ्या मोबाईल नं वर करावे
तसेच आपण सायबर क्राईम कडे सुद्धा तक्रार करू शकता,यासाठी सायबर क्राईम च्या वेबसाईटवर तक्रार देण्याची सुविधा उपलब्ध आहे.