विषय : जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेबाबत…….
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी संदर्भीय दि.०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतूदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत (बदलीस पात्र असलेल्या / विशेष संवर्ग भाग-१ मधील / विशेष संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांची यादी, निव्वळ रिक्त पदांची यादी. संभाव्य रिक्त पदांची यादी, जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे, इत्यादी) वेळोवेळी आपणास शासन स्तर बरुन निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच संदर्भीय दि. ०७/०४/२०२१ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने काही मुदांबाबतचे स्पष्टीकरण संदर्भीय दि. ०३/०६/२०२२ च्या पत्रान्वये Vinsys IT Services (I) Pvt. Ltd यांना कळविण्यात आले आहे.
बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा ३ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल असे शिक्षक, अशी स्पष्ट तरतूद संदर्भीय शासन निर्णयातील व्याख्येतील अ.क्र. १.७ मध्ये नमूद आहे. त्यामुळे संदर्भीय दि. ०३/०६/२०२२ च्या पत्रासोबतच्या स्पष्टीकरणात्मक मूहांतील अ.क्र. ८ येथील मुद्यांबाबतचे स्पष्टीकरण रद्द करण्यात येत आहे.
६. सबब, शासन निर्णय दि. ०७/०४/२०२१ मधील वरील तरतूद विचारात घेता ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा ३ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल, मग अशी सेवा अवघड क्षेत्रातील एक किंवा अधिक शाळांतील असली तरीही, अशा शिक्षकांचा बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक संवर्गात समावेश करणे आश्यक आहे. त्यामुळे अशा शिक्षकांच्या बाबतीत बदल्यांबाबतच्या संगणक प्रणालीमध्ये (एकापेक्षा अधिक अवघड क्षेत्रातील शाळेतील सेवा असल्यास) ते यापूर्वी कार्यरत असलेल्या सर्वात अगोदरच्या अवघड क्षेत्रातील शाळेचा हजर झाल्याचा दिनांक हा अवघड क्षेत्रात रुजू दिनांक म्हणून नमूद करावा. जेणेकरून अशा शिक्षकांची अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा ३ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त होत असेल, असे शिक्षक शासन निर्णयातील तरतूदीनुसार संगणक प्रणालीमध्ये बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून अर्ज करु शकतील. तथापि, संबंधित शिक्षकाची अवघड क्षेत्रातील सलग सेवा असल्याची संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी खात्री करुन तसे प्रमाणित करावे, ही विनंती.