भारतातील लोकांचा प्रसिद्ध पासवर्ड 123456 तुमचा पण आहे का लगेच बदला नाहीतर पासवर्ड हॅक होऊ शकतो.

आपण आज अनेक अकाऊंट वापरत असतो तसेच ATM, DEBIT CARD, CREDIT कार्ड ही वापरतो तसेच लॅपटॉप, डेस्कटॉप,मोबाईल किंवा इतर डिव्हाईस या प्रत्तेकाला पासवर्ड सेट करता येतो.मग आपण याला कोणता पासवर्ड वापरतो,तर भारतातील बहुतांशी लोक हे 123456 हा पासवर्ड वापरतात हा पासवर्ड हॅक करण्यासाठी सर्वात सोपा आहे.त्यामुळे आपल्या अकाउंट ला हा पासवर्ड असेल तर लगेच बदला व एखादा अवघड पासवर्ड द्या.जेणेकरून तो हॅक होणार नाही.

123456हा पासवर्ड आपण का ठेवत असतो कारण तो लक्षात राहण्यासाठी सोपा आहे टाईप करण्यासाठी सोपा आहे. पण असे करणे धोक्याचे होऊ शकते.काही लोक तर डिफॉल्ट पासवर्ड बदलत नाहीत म्हणजे सुरुवातीला कंपनीकडून आलेला पासवर्ड तोच वापरतात तर अशा लोकांनी ही आपला डिफॉल्ट पासवर्ड बदलून घ्यावा.

त्यामुळे सायबर गुन्ह्यासारख्या (Cyber Crime) घटना घडण्याच्या शक्यता अधिक वाढतात. त्यामुळे तुमचाही पासवर्ड असाच असेल तर तो लगेच बदला.

अजूनकाही भारतीय लोकांचे आवडते पासवर्ड आपण पाहू या

भारतातील लोकांचे 123456 बरोबरच आय लव्ह यू (Iloveyou), कृष्ण (Krishna), साईराम (Sairam) ओमश्रीराम (0msairam) हे पासवर्ड खूप वापरले जातात. नव्या संशोधनानुसार,भारतातील लोक काही भावनिक शब्द, देव देवतांची नावं तसेच क्रमवाचक संख्या पासवर्ड म्हणून ठेवण्यास भारतातील लोक प्राधान्य देतात. बरेच लोक व्यक्ती, नातेवाईकांची नावे भावनिक शद्ब पासवर्ड म्हणून ठेवण्याचे प्रमाण सर्वच देशामध्ये सारखेच आहे.भारतातील लोक पासवर्ड म्हणून 123456789, 12345678, india123, qwerty, abc123, xxx, Indya123, 1qaz@WSX, 123123, abcd1234 and 1qaz यांचा वापर जास्त प्रमाणात करतात.

Password हाच शब्द पासवर्ड म्हणून वापरनाऱ्यांचं प्रमाण सुद्धा खूप जास्त आहे. एकूण 43 देशांमध्ये अनेक लोक पासवर्ड म्हणून ‘password’ हाच शब्द वापरतात तर जवळपास 50 देशांतील लोक पासवर्ड म्हणून ‘123456’ याचा वापर करतात.

काही लोक आपल्या आवडत्या व्यक्तीचे नाव पासवर्ड म्हणून वापरतात

संशोधनाने हे देखील स्पष्ट केले आहे की टॉप पासवर्ड हे कमकुवत आहेत. हे पासवर्ड क्रॅक करण्यासाठी हॅकरला खूप कमी वेळ लागतो.भारतात 200 पैकी 62 पासवर्ड एका सेकंदापेक्षा कमी वेळात क्रॅक होऊ शकतात. हे प्रमाण 31 टक्के आहे, तर जागतिक स्तरावर ही टक्केवारी 84.5 टक्के आहे. दुर्दैवाने आपले पासवर्ड कमकुवत होत चालले आहेत.पासवर्ड हा आपल्या डिजिटल व्यवहाराच्या लॉकर ची चावी आहे त्यामुळे पासवर्ड स्ट्रॉंग असणे खूप गरजेचे आहे.तेव्हा आजच आपले पासवर्ड स्ट्रॉंग करून घ्या व आपले डिजिटल व्यवहार सुरक्षित करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *