जिल्हाअंतर्गत बदली नवीन वेळापत्रक_

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे वेळापत्रक उपरोक्त संदर्भ क्र. ४ नुसार निर्गमीत करण्यात आले आहे. परंतु, प्रशासकीय कारणास्तव दिनांक २१.१०.२०२२ चे पत्र सुधारित करण्यात येत असून शिक्षकांच्या बदल्यांबाबत सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबत सुधारित धोरण दिनांक ०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहे.

सन २०२२ मध्ये होणाऱ्या बदल्यांकरिता पदावधीची परिगणना दिनांक ३१ मे ऐवजी दिनांक ३० जून, २०२२ पर्यंत करण्यास संदर्भ क्र. २ येथील दिनांक ४.५.२०२२ च्या शासन निर्णयान्वये तरतूद करण्यात आली आहे. तसेच सन २०२२ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी संदर्भ क्र. ३ येथील दिनांक २९.६.२०२२ च्या शासन निर्णयात विहित केलेल्या कालावधीनुसार बदल्यांबाबतची कार्यवाही संगणक प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. उक्त दिनांक ४.५.२०२२ व दिनांक २९.६.२०२२ च्या शासन निर्णयानुसार होणारी कार्यवाही फक्त सन २०२२ मध्ये होणाऱ्या बदल्यांकरिताच लागू राहील.

आता ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित केले आहे :-

राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे होणाऱ्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही उपरोक्त वेळापत्रकाप्रमाणे राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हांतर्गत बदलीच्या अनुषंगाने करावयाची सर्व कामे विहित कालावधीतच पुर्ण करण्याची दक्षता घ्यावी. जर सदर कामामध्ये दिरंगाई/ कुचराई झाल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *