वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पध्दतीने जिल्हास्तरावर

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पध्दतीने जिल्हास्तरावर

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पध्दतीने जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थांमध्ये आयोजित करणेबाबत.

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाची जबाबदारी राज्य शासनाकडून परिषदेस सोपविण्यात आली आहे.यानुसार किमान १० दिवसांचे किंवा ५० घडयाळी तासांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक करण्यात आले. यापूर्वी कोविड १९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीमुळे सदर प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरुपात घेण्यात आले होते. वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पध्दतीने घेणेबाबत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी (डायट) संघटना यांचेकडून तसेच वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पध्दतीने घेणेबाबत क्षेत्रिय कार्यालयांकडून विनंती करण्यात आली आहे.

प्रत्यक्ष वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण प्रभावीपणे दिले जाऊन, प्रशिक्षणांतर्गत तज्ञांचे मार्गदर्शन व प्रशिक्षणार्थीचे परस्परामधील संभाषणात्मक शैलीतून अनुभव व विचारांची देवाण-घेवाण सहजगत्या व्हावी, तसेच सदर प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा उपयोग शैक्षणिक सेवेत होऊन शिक्षक अधिकसक्षम व्हावा या उद्देशाने वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे आयोजन सन २०२४-२५ पासून ऑफलाईन पध्दतीने जिल्हास्तरावर म्हणजेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांमध्ये घेण्याचे नियोजित आहे. याकरिता सर्व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी ५ तज्ञ अभ्यासक/तज्ञ मार्गदर्शक यांची नावे परिषदेस दि.५ जून २०२४ पर्यंत ई-मेल आयडीवर सादर करण्याच्या सूचना राज्यस्तरावरून देण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतोल वरिष्ठ अधिव्याख्याता/अधिव्याख्याता इत्यादी ३ तसेच याव्यतिरिक्त जिल्हयातील इतर २ तज्ञ मार्गदर्शकांचे नावांचा समावेश करण्याचे सूचित केले आहे.
यानुसार या पुढील प्रशिक्षण हे ऑनलाईन न होता जिल्हा स्तरावर ऑफलाईन होणार आहेत.

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण ऑफलाईन पध्दतीने जिल्हास्तरावर

पत्र वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *