मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र महिलांना मिळणार 1500 रू महिना | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra 2024

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra 2024 – महाराष्ट्रातील मुली व महिलांना आता दर महा 1500 रू मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने नवीन योजना चालू केली आहे. या योजनेअंतर्गत मुली व महिला यांना मदत व्हावी यासाठी हे पैसे दिले जाणार आहेत.

तर या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” साठी अर्ज कसा करावा?, अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती?

तसेच या योजनेसाठी कोणत्या मुली व महिला अर्ज करू शकता?, या योजनेसाठी वयाची अट काय आहे?

तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

अर्ज करण्याची वेबसाईट कोणती? अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना काय आहे? ते पाहूया महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील मुली व महिलांना दरमहा 1500 रू दिले जाणार आहेत.

तर ही मदत महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी दिले जाणार आहे.

तर महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो.

सदर परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण” योजना सुरू करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज कसा करावा | How to apply for Mukhyamantri Mazi Ladaki Bahin yojana
माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी योजनेचे पोर्टल तयार केले जाईल.

तसेच मोबाईल ॲप द्वारे किंवा सेतू केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.
ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल अशा महिला ग्रामपंचायती सेतू केंद्रावर जाऊन अर्ज करू शकता.
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर संबंधित व्यक्तीकडून अर्जाची पोचपावती दिली जाईल.
तसेच अर्जदार महिलेला फॉर्म भरत्यावेळी स्वतः हजर राहावे लागेल. कारण महिलेचा फोटो काढण्यात येईल तसेच ही केवायसी करण्यात येईल.

शासन निर्णय वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *