हेलिकॉप्टर Mi-17V5 ची काय विशेषता आहे, ज्यामध्ये CDS बिपिन रावत,त्यांची पत्नी व सेना ऑफिसर्स यांचा दुर्दैवी अंत झाला.

वायूसेनाचे हेलिकॉप्टर MI 17V5 मध्ये अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. हा वायूसेनेच्या महत्त्वपूर्ण कार्याचा हिस्सा आहे. पण, अनेकवेळा ते क्रैश होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. 2017 मध्ये अरुणाचल प्रदेश व चीन सीमा पासून 12 km दूर तांत्रिक खराबी मुळे वायुसेनेचे विमान क्रैश झाले. या घटनेत अर्धा डझन पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता 2019 मध्य Mi 17V5 श्रीनगर च्या बडगाम मध्ये क्रैश झाले होते. त्यामध्ये दोन पायलट चा मृत्यू झाला होता. हेलीकॉप्टर मध्ये असलेले 6 पेक्षा जास्त एअरफोर्स अधिकारी जखमी झाले होते. आज च्या घटनेत नेमके काय झाले होते ते तपासाअंती समजेल.

काय विशेषता आहेत

भारताने रशियन कंपनीकडून MI 17 V5 हेलिकॉप्टर खरेदी केले आहे. त्यात अनेक मालिका आहेत. हे हेलिकॉप्टर ताशी 250 किलोमीटर वेगाने हवेत उडू शकते आणि कमाल 6,000 मीटर उंचीपर्यंत उडू शकते. त्याच्यासोबत दोन सहायक इंधन टाक्या देखील आहेत. एकदा इंधन भरल्यावर ते 580 किमी अंतर कापू शकते. तर सहाय्यक इंधनासह ते हजार किलोमीटरहून अधिक अंतर कापू शकते.
भारतीय हवाई दलाचे Mi 17V5 हेलिकॉप्टर हे लष्करी वाहतूक साठी वापरले जाते. रशिया या विमानांची निर्मिती करतो. हे हेलिकॉप्टरच्या Mi-8/17 कुटुंबाचा भाग आहेत. हे विमान जगातील सर्वात आधुनिक हेलिकॉप्टरपैकी एक मानले जाते. हे सैन्य आणि शस्त्रास्त्र वाहतूक मध्ये देखील तैनात केले जाऊ शकते. याचा वापर शोध मोहिमेमध्ये, गस्त घालणे, मदत आणि बचाव कार्यात केला जातो.

मोठं मोठ्या ऑफरेशन मध्ये सहभाग

2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी केलेल्या कारवाईतही या हेलिकॉप्टरचे सहकार्य घेण्यात आले होते. यातून दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी एनएसजी कमांडो कुलाब्यात दाखल झाले होते. या MI-17-V5 चा वापर 2016 च्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानी लॉन्च पॅड्स नष्ट करण्यासाठी करण्यात आला होता.

अत्याधुनिक शस्त्रास्त्र

सध्या यापैकी 150 हून अधिक हेलिकॉप्टर भारताकडे उपलब्ध आहेत. या हेलिकॉप्टरमध्ये आठ फायरिंग पोस्ट आहेत, ज्यात शत्रम-5 क्षेपणास्त्र, एस-8 रॉकेट, पीकेटी मशीन गन यांचा समावेश आहे. रात्रीच्या वेळी ऑपरेशन करण्यासाठी हे हेलिकॉप्टर हवाई दलाचे अतुलनीय मानले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *