सन २०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत सुधारित वेळापत्रक.

विषय: सन २०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत वेळापत्रक.

संदर्भ : १) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. जिपव- ४८२०/प्र.क्र.२२०/ आस्था. १४.

दिनांक ०७.०४.२०२१. २) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. जिपव- ४८२०/प्र.क्र. २९० / आस्था. १४. दिनांक ०४.०५.२०२२.

३) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. जिपव- २०२२/प्र.क्र. २९/ आस्था. १४. दिनांक २९.०६.२०२२.

४) शासनाचे समक्रमांकाचे दिनांक २३.१.२०२३ चे पत्र.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत उपरोक्त संदर्भ क्र.४ नुसार सुधारित

वेळापत्रक निर्गमीत करण्यात आले आहे. सध्या बदलीपात्र शिक्षकांची सॉफ्टवेअरद्वारे बदली प्रक्रिया चालविण्याकरिता दिनांक २७.१.२०२३ ते ३१.१.२०२३ (५ दिवस) हा टप्पा सुरु आहे. परंतु बदलीपात्र शिक्षकांची संख्या जास्त असल्याने सॉफ्टवेअरसाठी बदली प्रक्रिया चालविण्याकरिता दिलेला ५ दिवसाचा अवधी कमी पडत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे संदभाधीन दिनांक २३.१.२०२३ च्या वेळापत्रकामध्ये अंशतः सुधारणा करून शिक्षकांच्या बदल्यांबाबत सुधारित वेळापत्रक निश्चित करणे आवश्यक आहे.

सबब, राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करावयाच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे :-

राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे होणान्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतची यापुढील कार्यवाही उपरोक्त वेळापत्रकाप्रमाणे राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हांतर्गत बदलीच्या अनुषंगाने करावयाची सर्व कामे विहित कालावधीतच पुर्ण करण्याची दक्षता घ्यावी. जर सदर कामामध्ये दिरंगाई / कुचराई झाल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावा.

सदर वेळापत्रक आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांच्या निदर्शनास आणून त्याबाबत संबंधित शिक्षकांकडून पोहोच घ्यावी व आपल्या अभिलेखामध्ये जतन करुन ठेवावी.

पत्र वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *