शाळांमध्ये इंग्रजीवर अधिक भर,द्विभाषिक धोरण लागू करण्याचे वर्षा गायकवाड यांचे निर्देश

मराठी भाषिक विद्यार्थी हे स्पर्धेच्या युगात कुठेही मागे राहू नयेत.इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांचीही प्रगती व्हावी यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत.
विद्यार्थ्यांना सर्व संकल्पना समजाव्यात म्हणून द्विभाषिक धोरण लागू करण्याबाबत निर्देश राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत
काय आहे द्विभाषिक धोरण
राज्यातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतील संज्ञा,संकल्पना स्पष्टपणे समजाव्यात.इंग्रजी भाषेतील शब्द व त्यांचा वापर याची विद्यार्थ्यांना स्पष्टपणे जाण व्हावी या उद्देशाने इयत्ता पहिली पासूनच द्विभाषिक अभ्यास लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
द्विभाषिक भाषा अभ्यास हा सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर राज्यातील 448 शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे.या 488 शाळांची आदर्श शाळा म्हणून यापूर्वीच निवड केलेली आहे.या शाळेतील विद्यार्थ्यांना तसे पाठयपुस्तक देण्यात आले आहेत व पुढील वर्षी इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना द्विभाषिक पाठयपुस्तक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

1 डिसेंम्बर पासून राज्यातील सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *